शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

फलटणला आज राजकीय ‘दंगल’

By admin | Published: February 06, 2017 12:52 AM

अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : दोन्ही काँग्रेसतर्फे शेवटच्या क्षणी अर्ज भरणार

फलटण : राजकीय उलथापालथीसाठी प्रसिद्ध असलेल्या फलटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काही उलथापालथ होते का? याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. दोन्ही काँग्रेस आपली उमेदवारी यादी शेवटच्या दिवशी प्रसिद्ध करणार असल्याने कोण-कोण बंडखोरी करतोय की पक्ष बदल करतोय, याची उत्सुकता ताणली आहे. फलटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी विविध पक्ष राजकीय समीकरणे जुळविण्यात व्यस्त आहे. शेवटच्या दिवसापर्यंत काय घडामोडी घडतील, याचा नेम नसल्याने आतापर्यंत दिसून आले आहे. एका निवडणुकीला एक, दुसऱ्या निवडणुकीला दुसरे तर तिसऱ्या निवडणुकीला तिसरे समीकरण जुळविण्याचा इतिहास या तालुक्याचा आहे. फलटण तालुक्यावर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हाती गेल्या २५ वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. या सत्तेला छेद देण्याचा प्रयत्न विरोधकांच्या एकीअभावी आतापर्यंत यशस्वी झालेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांची महाआघाडी बनविण्याचा घाट घालण्यात आला होता. सर्व विरोधकांची महाआघाडी व्हावी, यासाठी जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत व कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. अनेक बैठका घेतल्या; मात्र जागावाटप व चिन्हावरच निवडणुका लढविण्याचा आग्रहामुळे अस्तित्वात येऊ लागलेल्या महाआघाडीत बिघाडी झाली व सर्वांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घोषित केला आहे. फलटण तालुक्यातील प्रमुख दोन पक्ष असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेस तसेच नव्याने तालुक्याच्या राजकारणात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपाने आपली उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केलेली नाही. भाजपाने गिरवी जिल्हा परिषद मतदार संघातून सह्याद्री कदम यांची उमेदवारी फक्त जाहीर केली आहे. मात्र, अंतिम यादी जाहीर करण्यास सर्वांनीच टाळाटाळ केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांचा मोठा भरणा आहे. तीच परिस्थिती काँग्रेसची असल्याने यादी शेवटच्या दिवशीच जाहीर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या व माजी पंचायत समितीचे उपसभापती पुष्पाताई सस्ते यांनी बंडखोरी करीत साखरवाडी जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये बंडखोरांवर भाजपची नजर असून, शेवटच्या दिवशी बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी