शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मराठा आरक्षणासाठी फलटणला मोर्चा

By admin | Published: November 20, 2014 9:58 PM

मराठा सेवा संघ, जिजाऊ, संभाजी ब्रिगेड, शिवसंग्रामचा पुढाकार

फलटण : मराठा आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती विरोधात ‘भाजप’ने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावे. दिवंगत गोपीनाथ मुंढे यांनी मराठा आरक्षणाचे दिलेले वचन भाजप शासनाने पूर्ण करावे आदी मागण्यांसाठी मराठा सेवा संघ, जिजाऊ, संभाजी ब्रिगेड, शिवसंग्राम संघटनांतर्फे फलटण तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. त्यानंतर नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे यांना निवेदन दिले. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. त्याठिकाणी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब पवार, तालुकाध्यक्ष स. रा. मोहिते, जिजाऊ ब्रिगेडच्या शारदा पवार, संभाजी ब्रिगेडचे विशाल शिंदे, शिवसंग्रामचे ठाणे जिल्हाध्यक्ष विलास आग्रे, भाजपचे सुशांत निंबाळकर, सुनील सस्ते यांची भाषणे झाली.यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणासाठी तत्कालीन आघाडी सरकारमधील माजी मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल दिल्यानंतर आघाडी सरकारने मराठा व मुस्लीम आरक्षणाचा निर्णय घेतला. दरम्यान, उच्च न्यायालयात आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने या आरक्षणास स्थगिती दिली आहे. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बेताची असल्यानेच ही मागणी करण्यात आली होती. ‘भाजप’ सत्तेत येण्यापूर्वी आरक्षण रद्द करण्याची भाषा करत होते. सत्तेत आल्यानंतर न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतर मराठा समाजात शासनाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. शासनाने आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडली नाही. शिवाय तीन तज्ज्ञ सचिवांच्या बदल्या केल्या. याचा परिपाक म्हणजे उच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. सर्वपक्षीय मराठा आमदारांनी यांचा विचार करून हिवाळी अधिवेशनात याबाबत सकारात्मक विचार करावा. (प्रतिनिधी)