लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन चार वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, तरीही त्यांच्या मारेकºयांपर्यंत पोहोचण्यास यश येत नसल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मारेकºयांची माहिती देणाºयास दहा लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.साताºयातील समितीने तब्बल २५ हजार पत्रके काढली असून, ही पत्रके संपूर्ण जिल्ह्यात वाटण्यात येत आहेत. दाभोलकरांची हत्या करणारे आरोपी सारंग दिलीप आकोलकर आणि विनय बाबूराव पवार यांचा फोटो आणि नावे या पत्रकांवर आहेत. माहिती देण्याºयास प्रत्येकी पाच लाख असे दहा लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन येत्या २० आॅगस्टला चार वर्षे पूर्ण होत आहेत. राजकीय शक्तीच्या अभावामुळे झालेल्या अक्ष्यंम्य दिरंगाईबाबत अंनिसचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने ‘जवाब दो आंदोलन’ करीत आहेत. या मोहिमध्ये प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, उदय चव्हाण, गणेश सतिजा, जयप्रकाश जाधव, वंदना माने, दिलीप महादार, हौसेराव धुमाळ, श्रीनिवास जांभळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.शुक्रवारी गुरुवार परज, पाचशे एक पाटी परिसरात अंनिसच्या कार्यकर्त्यांनी फरार आरोपींचे चित्र असलेले एक हजार प्रती वाटल्या. तसेच ‘जवाब दो’ चे मधुर संगीतही नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.पानसरे खून प्रकरणीदेखील दहा लाखआरोपी सारंग आकोलकर आणि विनय पवार या दोघांची माहिती देणाºयांची नावे गुप्त ठेवण्यात येणार आहेत. या दोघांवर कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणीदेखील दहा लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे. या दोघांच्या नावाची पत्रके शहरात ठिकठिकाणी वाटण्यात येत आहेत. तसेच भिंतीवर चिटकविण्यातही येत आहेत.
दाभोलकरांच्या मारेकºयांची छायाचित्रे सातारकरांच्या हाती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:09 AM