शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

चाळीस गुंठे शेती विकून रिक्षावाला बनवतोय पिक्चर!

By admin | Published: November 02, 2016 11:50 PM

हौसेला ना मोल : सिराज काझी यांच्या ‘झटपट लखपती रिक्षावाला’चे लवकरच चित्रीकरण

 जगदीश कोष्टी ल्ल सातारा मराठी चित्रपटसृष्टीने वेगवेगळ्या पेशांवर आधारित अनेक चित्रपट दिले. ‘हमाल दे धमाल’ चित्रपट तर प्रचंड गाजला; परंतु रिक्षावर कोणताच मराठी चित्रपट आला नाही. ज्या रिक्षानं अनेकांचे संसार उभारले, सुख-दु:खात साथ दिली. त्या रिक्षावर चित्रपट काढण्याचा निर्णय साताऱ्यातील रिक्षावाला सिराज काझी यांनी घेतला. चित्रपट काढण्याऐवढे आर्थिक पाठबळ नसल्यानं काझी यांनी चक्क वडिलोपार्जित आलेली स्वत:ची चाळीस गुंठे शेती विकलीय. ‘हौसेला मोळ नसतं’ म्हणतात हे विधान साताऱ्यातील सिराज काझी यांनी तंतोतंत सत्यात उतरवलं. टीव्ही, चित्रपटात आपणही दिसावं, असं सिराज यांना लहानपणापासून वाटत होतं; पण पोटाची खळगी भरल्याशिवाय काहीच शक्य नव्हतं. त्यामुळे फलटण तालुक्यातील तरडगाव सोडून सिराज साताऱ्यात आले. साताऱ्यात आल्यावर रिक्षा खरेदी करून रिक्षा व्यवसाय सुरू केला. मुंबई मायानगरीत गेल्यावर अनेकांचं आयुष्यच बदललं, असं सांगतात. पण ‘सॉलिवूड’ भी कुछ कम नहीं याचा प्रत्यक्ष सिराज यांना साताऱ्यात आल्यावर आला. साताऱ्यात लाभलेल्या निसर्ग वरदानामुळे अनेक मराठी, हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण सातारा, पाचगणी, महाबळेश्वर, कास, बामणोली परिसरात होते. या चित्रपटांच्या निर्मिती संस्थांना मदत करण्याची संधी सिराज यांना मिळाली. त्या ठिकाणी डबे पोहोचविणे, इतर कामे असल्यास ते करत होते. हे करत असतानाच स्वप्न साकारण्याची संधी मिळाली. ‘बापू बिरू वाटेगावकर’, ‘कुंकू झालं वैरी’, ‘बाबा लगीन’मध्ये रिक्षावाला, ‘गंगाजल’मध्ये गाण्यात तर भोजपुरी रंगोली चित्रपटात इन्स्पेक्टरची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. क्राईम मालिकेत पोलिसांची भूमिका साकारली. संधी मिळेल तेव्हा ते काम करत असतानाच पोटापाण्यासाठी रिक्षा व्यवसाय सुरूच होता. या रिक्षाने अनेक कठीण प्रसंगात साथ दिली. अनेक अनुभव आले. या अनुभवावर आधारित चित्रपट स्वत:च काढण्याचा निर्णय सिराज यांनी घेतला. त्यांच्या या कल्पनेला त्यांचे मित्र कॅमेरामन हिरालाल आतार यांची साथ लाभली. सिराज यांनी काही दिवसांपूर्वीच स्वत:च्या नावावरून ‘एस. के. फिल्म’ या चित्रपटनिर्मिती संस्थेची स्थापना केली. याच्या माध्यमातून ‘झटपट लखपती रिक्षावाला’ हा चित्रपट ते काढत आहेत. यामध्ये कॅमेरामनची जबाबदारी हिरालाल आतार सांभाळणार आहेत. या चित्रपटात चार गाणी असून, त्यांचे रिकॉर्डिंगही झाले आहे. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे अन् बेला शेंडे यांनी गाणी गायली आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, काझी यांचेच आहेत. हरिओम गुरू सुरदास यांचे संगीत लाभले आहे. ठेका धरायला लावणारे शिर्षक गीत ‘झटपट लखपती रिक्षावाला’ या चित्रपटाचे ध्वनी मुद्रण नुकतेच झाले. त्यातील शिर्षक गीत असलेले ‘आला रे आला रिक्षावाला’ हे आनंद शिंदे यांनी गायले आहे. उडत्या चालीवर अन् ठेका धरायला लावणारे याचे संगीत आहे. तसेच बेला शेंडे यांची ‘नटली गं...’ अन् ‘धुंदीत मस्तीत’ ही गाणे तरुणाईला पसंतीस उतरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.