सातारा : पिलाणीवाडी (वरची) ता. सातारा येथील चंद्रभागा बाळकृष्ण साळुंखे (वय ४०) यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास सव्वा लाखाचे दागिने चोरून नेले. याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रभागा साळुंखे हा कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. पेटीतील पितळेच्या डब्यातील १ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. साळुंखे या काही वेळानंतर घरी परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शना आले. यानंतर त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली
व्यवसायात पार्टनरशीपच्या आमिषाने युवकाची फसवणूकसाडेसहा लाखांना गंडा : राजस्थानातील व्यावसायिकावर गुन्हासातारा : व्यवसायात पार्टनरशीप देण्याच्या आमिषाने साताºयातील एका युवकाला तब्बल साडेसहा लाखांना गंडा घातल्याचे समोर आले असून, याप्रकरणी राजस्थानमधील एका व्यावसायिकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुं सीताराम गुप्ता (सध्या रा. शिवाजी नगर, सातारा. मूळ रा. जयपूर, राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, प्रवीण प्रकाश निकम (वय ३१, रा. माळवाडी, शाहूपुरी सातारा) यांची गुंड्डू गुप्ताशी अनेक वर्षांपासून ओळख होती. गुप्ता याचा मोती चौकातील एका गाळ्यात कपड्यांचा सेल होता. या व्यवसायामध्ये पार्टनरशीप देण्याचे आमिष गुड्डूने प्रवीण निकम यांना दाखविले. गुप्ता ओळखीचा असल्यामुळे त्यांनी साडेसहा लाख रुपये त्याच्या व्यवसायामध्ये गुंतवले. यावेळी त्यांनी त्याच्याकडून नोटरी करून घेतली होती. तसेच या बदल्यात गुप्ताने त्यांना धनादेशही दिला. मात्र, त्यावर त्याने बोगस सही केली. काही दिवसांनंतर गुप्ताने संबंधित सेल बंद केला. मात्र, निकम यांना त्यांचे पैसे आणि नफाही मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. रात्री उशिरापर्यंत गुप्ता याला अटक झाली नव्हती.