शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

Satara: पिंक, दिव्यांग, युवा, आदर्श मतदान केंद्र उभारणार; मतदान वाढविण्यासाठी प्रशासनाचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 4:12 PM

पिंक बुथ केंद्रावर सर्व मतदान अधिकारी, स्थानिक मतदान कर्मचारी, पोलिस कर्मचारी या महिलाच असणार

कऱ्हाड : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रशासनातर्फे विविध मतदान केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असून पिंक, दिव्यांग, युवा व आदर्श मतदान केंद्रांचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.मतदान केंद्र क्रमांक २३९ उंब्रज हे केंद्र पिंक बुथ सखी असणार आहे. केंद्रावर सर्व मतदान अधिकारी, स्थानिक मतदान कर्मचारी, पोलिस कर्मचारी या महिलाच असणार आहेत. या केंद्राला गुलाबी किंवा गुलाबी छटा असणारे विविध रंग दिले जातील. मतदान केंद्र क्रमांक १३४ अपशिंगे हे केंद्र दिव्यांग मतदान केंद्र असणार आहे. या केंद्रावरील सर्व मतदान अधिकारी, स्थानिक मतदान कर्मचारी व सुरक्षा कर्मचारी हे दिव्यांग असणार आहेत. मतदान केंद्र क्रमांक १५६ साप हे केंद्र युवा मतदान केंद्र असणार आहे. या केंद्रावरील सर्व मतदान अधिकारी, स्थानिक मतदान कर्मचारी व सुरक्षा कर्मचारी हे युवा असणार आहेत.मतदान केंद्र क्रमांक १४ नागठाणे, १४८ रहिमतपूर, २३३ उंब्रज, ३०३ पुसेसावळी ही केंद्रे आदर्श मतदान केंद्र म्हणून स्थापन केली जाणार आहेत. सुशोभित आकर्षक अशा या केंद्रात पेयजल, व्हीलचेअर, रँप वॉक, आरोग्य सेवक आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. मतदान केंद्र क्रमांक २८५ वाघेरी हे मतदान केंद्र पर्दानशी केंद्र असणार आहे. या केंद्रावर महिला मतदान कर्मचाऱ्यांच्या साह्याने पर्दानशी मुस्लिम महिला मतदारांची ओळख पटवण्यासाठी खास सुविधा असणार आहे.भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कऱ्हाड उत्तर विधानसभा निवडणूक प्रशासनाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी डॉ. जस्मिन शेख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे यांनी ही केंद्रे स्थापन करण्याचे नियोजन केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरkarad-north-acकराड उत्तरvidhan sabhaविधानसभाVotingमतदान