मायणी : ‘झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून, त्याचे दुष्परिणाम आता बघावयास मिळत आहेत. अशात जास्तीत जास्त झाडे लावणे ही काळाची गरज आहे. झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हीसुद्धा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे,’ असे प्रतिपादन प्राचार्य विजयकुमार पिसाळ यांनी केले.
मायणी येथील वनविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या मायणी-म्हसवड रोड लगत २३ जुलै जागतिक वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या फ्रेंड्स ग्रुपने आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मार्केट कमिटीचे माजी संचालक दादासाहेब कचरे, वैद्यकीय अधिकारी सुशील तुरुकमाने, तलाठी शंकर चाटे, पोलीस पाटील प्रशांत कोळी, मायणी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश सुरमुख, मायणी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष विवेक देशमुख, फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष महेश जाधव, राष्ट्रीय नेटबॉलपटू ओमसाई जाधव, सचिन देशमुख, दादा फडतरे, संस्कार जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नीम व उंबर प्रजातींची एकूण १२ झाडांचे वृक्षारोपण मायणी-म्हसवड रस्त्यालगत करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून मायणी वनविभागाच्या हद्दीमध्ये फ्रेंड्स ग्रुपकडून वेगवेगळ्या प्रजातीच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात येत असून, पर्यावरण संतुलित ठेवण्याच्या व मायणी वनविभाग हिरवागार करण्याच्या उद्देशातून या भागात वृक्षारोपण करण्यात येते त्यासाठी मायणी वनविभागाचे आम्हाला सहकार्य मिळते, असे मत फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष महेश जाधव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रशांत कोळी यांनी मानले.
२३मायणी
येथील मायणी-म्हसवड रस्त्यालगत वृक्षारोपण करताना प्राचार्य विजयकुमार पिसाळ, दादासाहेब कचरे,महेश जाधव व मान्यवर उपस्थित होते. (छाया : संदीप कुंभार)