कऱ्हाड ते चिपळूण मार्गावरील येराड ते घाटमाथापर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. संबंधित विभागाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. अखेर सोमवारी संगमनगर येथे रस्त्यातील खड्ड्यांत वृक्षारोपण करून पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली विभागातील ग्रामस्थांनी आंदोलन केले. कोरोना नियमांचे पालन करून व महामार्गावरील वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण न करता हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
पंकज गुरव, संजय कांबळे, बापूराव देवळेकर, श्रीपतराव माने, कमल कदम, मंगल माने, रवींद्र टोळे, रवींद्र कांबळे, अशोक लोखंडे, राजेंद्र पवार, उपसरपंच भरत चाळके, विठ्ठल निकम, महेंद्र कदम, दगडू यमकर आदी उपस्थित होते. आंदोलनप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोयनानगरचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
फोटो : ०५केआरडी०९
कॅप्शन : संगमनगर, ता. पाटण येथे येराड ते घाटमाथा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत सोमवारी वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन करण्यात आले. (छाया : नीलेश साळुंखे)