शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

माळरान भकास.. रोपांनी होणार झकास; राजमाची शिवारात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:05 PM

संतोष गुरव ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ज्या ठिकाणी सामाजिक, पर्यावरण उपक्रम त्या ठिकाणी कºहाडकर असे समीकरणच कºहाड व परिसरात पाहायला मिळतेय. कºहाडकरवासीयांकडून नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच सहभागही घेतला जातो. अशाच एका उपक्रमात कºहाकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागातर्फे राजमाची येथील माळरानावर वृक्षलागवड उपक्रमांतर्गत ६ हजार ...

संतोष गुरव ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ज्या ठिकाणी सामाजिक, पर्यावरण उपक्रम त्या ठिकाणी कºहाडकर असे समीकरणच कºहाड व परिसरात पाहायला मिळतेय. कºहाडकरवासीयांकडून नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच सहभागही घेतला जातो. अशाच एका उपक्रमात कºहाकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागातर्फे राजमाची येथील माळरानावर वृक्षलागवड उपक्रमांतर्गत ६ हजार २५० रोपे लावण्याच्या उपक्रमास कºहाडकरांनी उपस्थित राहून वृक्षारोपण केले.पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी वृक्ष अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. हे ओळखून जिल्हा प्रशासनाच्या वनविभागाच्या वतीने युद्धपातळीवर वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविला जात आहे. गत वर्षात राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. हरित महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी वनविभागातर्फे हाती घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत गत वर्षात कºहाड तालुक्यात ७२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. त्यातील ६ हजार २५० वृक्षलागवडीचा कार्यक्रम वनविभागाच्या वतीने राजमाची येथील माळरानावर घेण्यात आला.यावेळी कºहाड परिक्षेत्र वनअधिकारी डॉ. अजित साजणे, कºहाड पालिका मुख्याधिकारी यशवंत डांगे, जिमखान्याचे सुधीर एकांडे, मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, नाना खामकर, हेमंत केंजळे, डॉ. अनिल शहा आदींसह मसूर येथील आदर्श ज्येष्ठ नागरिक संघातील वयोवृद्ध सदस्य, नागरिकांसह तब्बल १५० तरुणांनी वृक्षारोपण कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून या उपक्रमात सामाजिक बांधिलकी जपली. दिवसभर पार पडलेल्या या कार्यक्रमात वड, पिंपळ, लिंब, करंज आदी रोपांची लागवड करण्यात आली.३१ जुलैपर्यंत या परिसरात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कºहाडकरांची वृक्षारोपणाप्रती असलेली ओढ दिसून आली असून वृक्षारोपणामुळे डोंगराचा कायापालट होणार आहे.या जातीच्यावृक्षांचा समावेशकºहाड तालुक्यात करण्यात ७२ हजार वृक्षलागवड उपक्रमत राबविला जात आहे. त्या वृक्षांमध्ये लिंंब, सिस, हेळा, आपटा, करंज, वाळवा, कांचन, चिंंच, वड, पिंंपळ, पळस, जांभूळ, उंबर, शिवर, साग, बदाम अशा तब्बल ६३ जातींच्या रोपांचा समावेश वृक्षलागवडीत करण्यात आलेला आहे.दहा हेक्टरवर फुलणार ६ हजार वृक्षकºहाडपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या राजमाची येथील वनविभागाच्या हद्दीतील माळरानावर तब्बल दहा हेक्टर क्षेत्रात ६ हजार २५० रोपांचे वृक्षारोपण करण्यात येत आहे. त्यासाठी रोपांइतकेच खड्डे काढण्यात आलेले आहेत. नुकताच प्रारंभ करण्यात आलेल्या या उपक्रमानंतर वृक्षारोपण पार पडल्यानंतर काही वर्षांत या माळरानावर वृक्ष डोलताना पाहायला मिळणार आहेत.जिमखान्याने केला वृक्षारोपण उपक्रमाचा ‘श्रीगणेशा’राजमाची येथे पार पडलेल्या उपक्रमास कºहाड जिमखान्याचे सुधीर एकांडे यांच्यासह रोहन भाटे, नाना खामकर हेही उपस्थित होते. यावेळी सुधीर एकांडे यांनी नारळ फोडून वृक्षलागवड उपक्रमाचा श्रीगणेशा केला.मुख्याधिकारीही हजरकºहाड शहरात विविध सामाजिक उपक्रमांत अग्रस्थानी राहून स्वच्छ व सुंदर कºहाड बनविणारे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनीदेखील राजमाची येथे वृक्षलागवडीस उपस्थिती लावली.