शेखर धोंगडे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केवळ एक-दोन नव्हे, तर शेकड्यांनी झाडे लावली. ती आज २० ते ३२ वयाची झाली आहेत. कारण जितके मुलांचे वय तितक्याच वयाची जगलेली अनेक ठिकाणची झाडे आजच्या क्षणालाही छान सावली व फळ देताहेत. मुलांच्या संगोपनाप्रमाणेच १९८७ पासून झाडे लावली व ती जगविली, असे कोरोची माळ (ता. इचलकरंजी) येथील वयाची सत्तरी पार केलेले निवृत्त आरोग्य अधिकारी जयप्रकाश कोळेकर हे अभिमानाने सांगतात.दरवर्षी ७ जूनला मुलगीचा वाढदिवस व पर्यावरण दिनी गेली ३२ वर्षे न चुकता सातत्याने झाडं लावण्याचे कर्तव्य आजही बजावत आहेत. वृक्षसंवर्धन, योगा व आरोग्यालाही तितकेच महत्त्व द्या असा त्यांचा संदेश आहे. निसर्ग जपा, सुंदर जगा हा सर्वांना कानमंत्र देण्याचा ते नेहमीच प्रयत्न करीत असतात. पर्यावरण व आरोग्य हे एकमेकांवर अवलंबून असल्याने ते सर्वांनी जपले पाहिजे.आवड नव्हे, कर्तव्य समजून झाडे लावली. निसर्गाने इतके दिले, त्याचे थोडेसे तरी आपण देणं लागतो. या भावनेतूनच अखंडितपणे मुलांचे वाढदिवसानिमित्त व मिळेल त्या मोकळ््या जागेत रोप लावली. ती जगविलीही. काहींना वृक्षसंवर्धनविषयी जागरुक करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मोकळी जागा, अंगण दिले. तेथे झाडे लावली. आज त्यांनाही त्या झाडांचे महत्त्व समजले आहे. तेही ही झाडे जगवू लागली आहेत. - जयप्रकाश कोळेकर कोरोची, इचलकरंजी.लावलेली झाडेनारळ, पिंपल, जांभूळ, शिसम, रामफल, लिंबू, लिंबू, तांबडा चाफा, पारिजात, आस्ट्रे, बाभूळ प्रत्येकी एक, आवळा, काजू, फणस, पपई, फणस, उंबर, प्रत्येकी दोन, आंबे, पेरू प्रत्येकी तीन, सीताफळ, कडूलिंब प्रत्येकी चार, पिकनेर, पांढरा चाफा, सागवान प्रत्येकी पाच, शेवगा १०, अशोक १२, जास्वंद, बोगमवेल प्रत्येकी पाच, गुलाब चार प्रकार, कोरांटी २, कोरफड, निवडुंग, अडुलसा, निरगुंडी, तुळस, सदाफुली, रातराणी, गुलवेल, वेकंड, कडीपत्ता, आबोली, गोखर्ण, पानफुटी,नाग दोन, मधुपर्णी, हळद, पर्णकमल, रानकांदा, लहान मोठी लिली, ओवा, शोभेची काही झाडे, सुरण, मोगरा, कुंदा इत्यादी ५५ ते ६० प्रकारच्या झाडाबरोबरच शेकडो झाडे जगविली. ठिकाणेही झाडे कोरोची माळ येथील स्वत:च्या जागेसह शेजारच्यांची मोकळी जागा, मित्रांचे अंगण व विविध गावचे पाहुणे यांच्याही अंगणातही झाडे लावली व ती जगविली. सर्व झाडे सर्वसाधारण तीसच्या वयाची असून या महिन्यातही २० पेक्षा अधिक झाडे लावली आहेत.कर्तव्य जपा--निसर्ग आपल्याला जगवितो तसेच आपणही कर्तव्य म्हणून पर्यावरणाचे हित जपावे. प्रकृतीसाठी योगा, आहार व पर्यावरणासाठी प्रदूषण टाळणे महत्त्वाचे असल्याने ते आजही कचऱ्याचे खत व सांडपाण्याचा उपयोग बगीच्यासाठी व आरोग्यासाठी सायकलिंगला महत्त्व देतात.
आवड नव्हे तर कर्तव्य समजून झाडे लावली
By admin | Published: June 16, 2017 1:01 AM