कऱ्हाड तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागात हे गाव असून, खडतर रस्ते, डोंगर पठारावर ते वसले आहे. त्याची साधारणत: चारशे ते साडेचारशे लोकसंख्या असून, येथे ये-जा करताना व मानवी सुविधा पुरवताना प्रशासनासह ग्रामस्थांची मोठी पंचाईत होते. अशाच या दुर्गम भागात कऱ्हाड रोटरी क्लबने हे गाव त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून अंधमुक्त केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष गजानन माने, सचिव डॉ. शेखर कोगनूळकर, रोटेरियन व माजी अध्यक्ष नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. राहुल फासे यांनी पुढाकार घेऊन नेत्र शिबिर आयोजित केले. तेव्हा चार रुग्ण हे मोतीबिंदूबाधित असल्याचे दिसून आले. त्यानुसार रोटरीनी तातडीने या लोकांची नेत्र शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन केले.
नुकतेच सर्व नेत्ररुग्णांना स्वखर्चाने वाहनातून रोटरी क्लबच्या सदस्यांनी डॉ. राहुल फासे यांच्या नेत्र रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांना नवी दृष्टी दिली. रोटरियन राजेश खराटे, किरण जाधव, जगदीश वाघ, चंद्रकुमार डांगे, प्रबोध पुरोहित, सचिव डॉ. शेखर कोगनूळकर, अध्यक्ष गजानन माने आदींनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
फोटो
‘अंधमुक्त गाव’ या सामाजिक उपक्रमात शस्त्रक्रिया केलेल्या ग्रामस्थांसमवेत डाॅ. राहुल फासे, डाॅ. शेखर कोगनूळकर आदी.