सातारा : ‘खेळाडूंना आर्थिक पाठबळाबरोबरच पालकांचेही पाठबळ मिळाले पाहिजे. ग्रामीण भागातील खेळाडूंना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यावर मात करून खेळाडू घडत असतात; परंतु अशा होतकरू खेळाडूंना चांगल्या प्रशिक्षकांची गरज असते,’ अशी इच्छा आशियाई पदक विजेती धावपटू ललिता बाबर हिने व्यक्त केली.सातारा जिल्हा क्रीडा फेडरेशन आणि जिल्हा अॅमॅच्युअर अॅथलेटिक असोसिएशनच्या वतीने ललिता आणि तिचे वडील शिवाजी बाबर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ती बोलत होती. जिल्हा क्रीडाधिकारी उदय जोशी, प्रशिक्षक भास्कर भोसले, ज्ञानेश काळे, भरत चव्हाण आदी उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिरुद्ध गुजर, जनाबाई हिरवे, राष्ट्रीय पदक विजेते शशिकांत पाटील, अतुल पाटील, अरुण डुबल, तेजस्विनी पाटील, संतोष बर्गे, स्नेहल राजपूत यांचाही सत्कार करण्यात आला. राज्य अॅथलेटिकचे सरचिटणीस संजय वाटेगावकर, अध्यक्ष पांडुरंग शिंदे, उपाध्यक्ष अशोकराव थोरात, सरचिटणीस उत्तमराव माने, कार्याध्यक्ष राजेंद्र चोरगे, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष राम कदम, सुधीर पवार, सुजित शेडगे, कन्हय्यालाल पुरोहित आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
खेळाडूंना चांगल्या प्रशिक्षकांची गरज
By admin | Published: October 30, 2014 12:38 AM