मसूर, ता. कऱ्हाड येथे सातारा जिल्हा अमॅच्युअर खो-खो असोसिएशन व क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरुष व महिला खो-खो अजिंक्यपद स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी असोसिएशनचे सरचिटणीस महेंद्रकुमार गाढवे, निवड समिती सदस्य दादासाहेब चोरमले, मनीषा शिंदे, ज्ञानेश्वर जांभळे, शशिकांत गाढवे, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कासम पटेल, सदस्य शरद जाधव, सतीश शेजवळ उपस्थित होते.
या स्पर्धेत पुरुषांच्या गटात मसूर क्रीडा मंडळाने प्रथम, तर सातारच्या श्रीकृष्ण संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. यावेळी भलरी रोपवाटिका यांच्यातर्फे सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून अकीब पटेल याला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांच्या गटात प्रथम क्रमांक साखरवाडी संघाने व द्वितीय क्रमांक शिवनगर संघाने मिळविला. स्पर्धेसाठी पंच म्हणून महाराष्ट्र राज्य पंच प्रशांत कदम, अनिकेत मोरे, अतुल मोरे, मयूर साबळे, आनंदा जगदाळे तर गुणलेखक व वेळाधिकारी म्हणून लक्ष्मण जाधव, आकाश कदम यांनी काम पाहिले. दुपारच्या सत्रात मुलींच्या संघाला बक्षीस वितरण मसूर पोलीस दूरक्षेत्रचे उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन संभाजी बर्गे यांनी केले. आभार गोल्डन पवार व दिलीप माने यांनी मानले.
- चौकट
स्पर्धेला मान्यवरांनी दिली भेट
या स्पर्धेस राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, महानंदाचे संचालक वसंतराव जगदाळे, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष संगीता साळुंखे, दिलीपसिंह जगदाळे, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, कुलदीप क्षीरसागर, क्रीडा संघटनेचे कोल्हापूर विभागीय उपाध्यक्ष महेंद्र भोसले, जिल्हा सचिव मनोहर यादव, विकास पाटोळे, प्रा. कादर पिरजादे, सागरभाऊ पाटोळे आदी मान्यवरांनी भेट दिली.
फोटो : २७केआरडी०४
कॅप्शन : मसूर, ता. कऱ्हाड येथे खो-खो स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी कृष्णत जाधव, संभाजी बगे आदी उपस्थित होते.