श्वानांचा उपद्रव
कुसूर : कोळे (ता. कऱ्हाड) परिसरात मोकाट श्वानांच्या उपद्रवात वाढ झाली असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या मोकाट श्वानांनी परिसरातील काही गावांमध्ये दहा दिवसांत अनेक पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत. होणारे नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने तत्काळ या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हातगाडे वाढले
कऱ्हाड : येथील बाजारपेठ मार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फिरस्त्या विक्रेत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. विक्रेते आपले हातगाडे घेऊन बाजारपेठेतील रस्त्यांवर घुसत आहेत. अनेकजण रस्त्यातच हातगाडा उभा करून व्यवसाय करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. बेशिस्त हातगाडे उभा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
भाजी रस्त्यावर (फोटो : २३इन्फोबॉक्स०२)
कऱ्हाड : येथील मुख्य पोस्ट कार्यालय रस्त्यावर बसून भाजी विक्रेत्यांकडून व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. पालिकेतर्फे संभाजी भाजी मंडईत जागा देऊनही तेथे विक्रेते बसत नाहीत. मुख्य पोस्ट कार्यालय रस्त्यात बसूनच ते व्यवसाय करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.