स्वप्नील शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : चांगला भाव मिळेल, या आशेने सातारा तालुक्यातील रामचंद्र जाधव या शेतकऱ्याने कांद्याचे उत्पादन घेतले; पण पुढे पदरी निराशा पडणार, याची तसूभरही कल्पना नसताना ते बाजारात कांदा घेऊन आले. पाचशे किलो कांद्याची विक्री करून वाहतूक व हमाली दिल्यानंतर हाती काहीच शिल्लक राहिले नाही. उलट व्यापाºयालाच जास्तीचे पाच रुपये देण्याची वेळ आल्याने शेतकºयाच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आले.दैनंदिन आहारातील अविभाज्य घटक असलेल्या कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये काद्यांचे दर पुन्हा गडगडल्याने किलोमागे सात ते नऊ रुपये असा दर मिळत आहे. त्यातच यंदा मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्याने शेतकºयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला.दुष्काळी परिस्थितीत अनेक शेतकºयांनी मोठ्या हिमतीने कांद्याची लागवड केली. मात्र, पावसाअभावी पाणी टंचाईचा सामना करावा लागल्याने अपेक्षित उत्पादन शेतकºयांच्या हाती आले नाही. तसेच कांद्याचा आकारच न बनल्याने तो बारीक राहिला. गेल्या काही दिवसांपासून बाजारात कांदा आल्याने कांद्याचे दर गडगडले.त्यापैकीच एक शेतकरी असलेल्या रामचंद्र जाधव यांनी मोठ्या अपेक्षेने उत्पादित कांदा रविवारी पहाटे लवकर उठून सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत आणला. सकाळपासून बाजारात विक्रीला सुरुवात झाली. व्यापाºयाकडून व्यवहार सुरू होऊन दोन तास झाले तरी कांद्याची विक्री होत नव्हती. बाजार बंद होण्याच्या वेळेस व्यापाºयाने जाधव यांना कांदा परत न्यावा, असा सल्ला दिला. त्यावेळी जाधव यांनी निराश होऊन ‘घरी नेऊन काय करू, जेवढ्यात जाईल तेवढ्यात जाऊ द्या,’ असे सांगितले. नाईलाजास्तव विक्रेत्याने अवघ्या एक रुपये किलोने कांद्याची विक्री केली.सकाळपासून जाधव हे बाजार समितीत व्यापारी आणि खरेदीदारांकडून कांद्याचे व्यवहार पाहत होते. दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा कांदा विक्रेत्याने एक रुपयाने मागितला. तेव्हा जाधव अक्षरश: ढसाढसा रडू लागले. कांद्याचा व्यवहार झाल्यानंतर वाहतूक व हमाली वजा करून व्यापाºयाकडून जाधव यांच्या हाती पट्टी आली, तेव्हा व्यापाºयाला आपणच पाच रूपये देणे लागत असल्याचे पाहून तर ते अवसान गळून खाली बसले. एवढे कष्ट करूनही हाती काहीच न मिळाल्याने ते रिकाम्या हातानेच घरी परतले.बाजार समितीत मिळालेली पावतीपोती ९ नगवजन ४४४ किलोदर १ रुपये प्रतिकिलोएकूण रक्कम ३९९. ६० रुपयेहमाली ४४.६०मोटार भाडे ३६०एकूण खर्च ४०४ रुपयेखर्च वजा जाता ५ रुपये येणेकांद्याने केला वांदारामचंद्र जाधव यांना मिळालेल्या कांद्याचा भाव हा कवडीमोल होता. त्यामुळे हा भाव दुसºयांना सांगायलाही त्यांना अपमानास्पद वाटत होते. त्यांनी गावाचे नाव न घेता बातमी करा, अशी विनंती केली. यावरून शेतकºयाला होणाºया दु:खाचे प्रतिबिंब पाहावयास मिळत आहे.
पाचशे किलो कांदे विकूनही खिसा रिकामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 11:12 PM