तळमावले (ता. पाटण) येथे कवी प्रदीप पाटील यांच्या ‘साठवण’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पंचायत समिती सदस्या सीमाताई मोरे, कुसुमताई करपे, प्राचार्य डॉ. अरुण गाडे, कवी प्रदीप पाटील, कवी उद्धव पाटील, कवी व लेखक अनिल म्हमाणे, लक्ष्मण पाटील, कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, सहायक अभियंता रोहिणी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तळमावलेतील काकासाहेब चव्हाण महाविद्यालय आणि प्रयास प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारंभ आयोजित केला होता.
सुनिती सु. र. म्हणाल्या, वांग मराठवाडीच्या धरणामुळे मी वीस वर्षे येथील लोकांची सुखदु:खे अनुभवत आहे. आपल्याला आपला गाव सोडून जावे लागते त्यावेळी काय अवस्था होते, हे मी अनुभवले आहे. कवी प्रदीप पाटील यांचा कवितासंग्रह याचेच प्रतिनिधित्व करतो.
अनिल म्हमाणे म्हणाले, साठवण हा कवितासंग्रह लढण्याची नेहमी आठवण करून देत राहील. हा कवितासंग्रह हा साहित्य प्रवाहाच्या विरुद्ध आहे. ऋणानुबंधांना बोलते करण्याचे काम या पुस्तकाने केले आहे.
कवी प्रदीप पाटील, सीमा मोरे, कुसुमताई करपे, प्राचार्य डॉ. अरुण गाडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात रोपट्याला पाणी घालून करण्यात आली. पुस्तक आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जी. एन. पोटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संदीप डाकवे यांनी सूत्रसंचालन केले, तर अॅड. अधिक चाळके यांनी आभार मानले.
फोटो : २४केआरडी०६
कॅप्शन : तळमावले (ता. पाटण) येथे ‘साठवण’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सुनिती सु. र. प्रदीप पाटील, सिमाताई मोरे, कुसुमताई करपे यांची प्रमुख उपस्थिती होती.