प्रगती जाधव-पाटील -साताराअनेक घरांमध्ये पिझ्झा, बर्गर, नुडल्स ही नावे अत्यंत सरावाने घेतली जातात. मुलांच्या जिभेवर ही नावे लिलया नाचू लागली की, त्यांचे कौतुक वाटते. काही घरांमध्ये तर ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून हे अन्नपदार्थ दिले जातात. या जंक फुडमध्ये शरीराला हानीकारक असे अनेक घटक असतात. ज्यामुळे मुलांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हळूहळू कोसळू लागले आहे.परदेशातून आलेले पिझ्झा, बर्गर, नुडल्स आपल्याकडे इतके रुजले की, हे पदार्थ आयात केलेले आहेत हे कोणालाच समजलेच नाही. वास्तविक परदेशी जीवनशैलीला साजेसे हे सगळे पदार्थ आहेत. भारतीय वातावरण आणि येथील अन्नसंस्कार खूप वेगळे आहेत. आपल्याकडे प्रांतानुसार अन्न पदार्थ बदलतात. दर पन्नास किलोमीटरवर चव आणि पदार्थ बदलतात. त्यामुळे आपल्याकडे हे आयात केलेले पदार्थ खाणे धोक्याचेच आहे.अन्य शहरांच्या तुलनेत साताऱ्यात जंक फुड मिळण्याची दुकाने कमी आहेत; पण जे काही जंक फुड येथे मिळते त्याच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह आहेच. पिझ्झा, बर्गर आणि नुडल्स् ही पूर्वी बोटावर मोजण्या इतक्या हॉटेल्समध्ये मिळत होते. आता तर बेकरीमध्येही उपलब्ध आहे.शहरातील बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या शाळा सकाळी लवकर असतात. भले पहाटे उठून डबा करण्यापेक्षा मायक्रोवेव्हला गरम करून इन्सटंट फुड देण्याची क्रेझ काही घरांमध्ये पाहायला मिळते. यात प्रामुख्याने वेफर्स, चिज बॉल, फ्रेंज फ्राईज, रेडिमेड वडा, रोल, सामोसा आदी पदार्थ दिले जातात. मुलांच्या डब्यात तेलकट पदार्थ टाळावेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण याकडे दुर्लक्ष करून अनेकदा मुलांना हे पदार्थ खायला घालतात. काय होते जंक फुडच्या सेवनाने पहा उद्याच्या भागात. जंक फुड म्हणजे काय?जंक फुडचा शब्दश: अर्थ निरुपयोगी खाद्य असा आहे. आपल्याकडे पिझ्झा, बर्गर, नुडल्स,फास्ट फुड, चायनीज यांची गणना जंक फुड मध्ये करण्यात आली आहे. जंक फुड मध्ये दडलंय काय?जंक फुडमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज आणि अल्पप्रमाणात पौष्टिक सत्त्व असतात. हे अन्नपदार्थ जास्त दिवस टिकावेत, यासाठी त्यात काही घटकांचा वापर केला जातो. त्यामुळे कृत्रिमरीत्या अन्नपदार्थाचे आयुष्य वाढविले जाते. अन्न संस्कारानुसार कोणतेही अन्न चोवीस तासांपेक्षा अधिक काळ ठेवू नये. ते अन्न ग्रहण करणे म्हणजे पचनक्रियेवर अन्याय, असे मानले जाते. आपल्याकडे मिळणारे हे सगळे जंक फुड महिनोमहिने फ्रिजमध्ये साठवून गरजेनुसार वापरले जाते. त्यामुळे या जंक फुडमध्ये आजारी पाडणारे अनेक घटक दडले आहेत.प्लास्टिक डबा नकोच!अनेक चिमुकल्यांना क्रेझ म्हणून आकर्षक आणि आवडत्या कार्टुनच्या चेहऱ्यांचा प्लास्टिकचा डबा दिला जातो. कोणतेही अन्न प्लास्टिकच्या डब्यात नेऊ नये. अन्नपदार्थातील काही घटक आणि प्लास्टिक यांचा संयोग आल्याने हे अन्न विषारी स्वरूप धारण करू लागते. विशेषत: नुडल्स, भाजी, चायनीज राईस. त्यामुळे मुलांना स्टिलचा डबा घ्यावा. डब्यामुळे मुलांमध्ये स्पर्धासाताऱ्यात अनेक शाळांमध्ये डब्यावर भाजी पोळी आणणे बंधनकारक आहे. आठवड्यातून एक दिवस किंवा शनिवारी मुलांना बाहेरील खाद्य पदार्थ आणण्यास परवानगी दिली जाते. मात्र, काही शाळांमध्ये मुलांच्या डब्यावर नियंत्रण नाही. त्यामुळे अनेक महागडे अन्न पदार्थ डब्यातून आणले गेल्याने मुलांमध्ये स्पर्धा निर्माण होत असल्याची काही शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले.
‘चिमुकल्यांचा डबा’ ठरू नये विष
By admin | Published: June 11, 2015 10:30 PM