कºहाड : पालिकेच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून चकाचक डांबरी रस्ते तयार करण्यात आले. मात्र, त्यावर खोदकाम केल्याने शहरात पुन्हा खड्डे दिसून लागले. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच पालिकेकडून खड्डे मुजविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. चकाचक रस्त्यांना खड्ड्यांमुळे ‘बुरे दिन’ आले होते. ते आता नाहीसे होऊन अच्छे दिन येणार यात शंका नाही.
शहरातील शासकीय विश्रामगृह मार्ग, राजर्षी शाहू महाराज चौक ते दत्तचौक मार्ग, बसस्थानक परिसर, विजय दिवस चौक आदि ठिकाणी सध्या चकाचक रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबतची वस्तूस्थिती ‘लोकमत’ने रविवार, दि. १३ रोजी वृत्त प्रसिद्ध करून मांडली. तसेच पालिका प्रशासनाच्या भोंगळ कामाची माहिती दिली. याची पालिकेकडून दखल घेण्यात आली आहे. ‘लोकमत’वतीने शहरातील खोदकामात काढलेले खड्डे आजपासून मुजविण्याच्या कामास प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला आहे. तीन कर्मचारी अन् तासाभराचे काम
येथील दत्तचौकातील आयलॅन्ड शेजारी अनेक दिवसांपासून खोदकाम केल्यामुळे खड्डा पडला होता. त्यावरून एखादे वाहन गेल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, सुदैवाने कोणता अपघात झाला नाही. गुरूवारी सकाळी बांधकाम करणाºया तीन कर्मचाºयांनी सिमेंट, वाळू, विटांच्या साहाय्याने खोदकामात असलेल्या पाण्याच्या पाईपच्या वॉल्व्हभोवती बांधकाम केले व खड्डे मुजविला. आणि अनेकदिवसांपासून तसाच पडून असलेला खड्डा अवघ्या तासाभरात मुजविला गेला.