शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

पोलिसांच्या पुन्हा ‘चुका’; भाजीवाले रस्त्याचे ‘पालक’ : मंगळवार तळे रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:24 AM

सातारा : शहरातील राजवाडा मंगळवार तळे रस्त्यावर पोलिसांच्या धाकाने विक्रेते मंडईत बसत होते. मात्र, पोलिसांची पाठ फिरली भाज्यांच्या पाट्या घेऊन हे विक्रेते पुन्हा रस्त्यावर बसू लागले आहेत. पोलिसांची आरंभशूर कारवाई अन् पालिकेची गांधारीची भूमिका यामुळे पोलिसांच्या पुन्हा ‘चुका’, भाजीवाले बनले रस्त्याचे पालक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.राजवाडा ते मंगळवार तळे ...

सातारा : शहरातील राजवाडा मंगळवार तळे रस्त्यावर पोलिसांच्या धाकाने विक्रेते मंडईत बसत होते. मात्र, पोलिसांची पाठ फिरली भाज्यांच्या पाट्या घेऊन हे विक्रेते पुन्हा रस्त्यावर बसू लागले आहेत. पोलिसांची आरंभशूर कारवाई अन् पालिकेची गांधारीची भूमिका यामुळे पोलिसांच्या पुन्हा ‘चुका’, भाजीवाले बनले रस्त्याचे पालक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राजवाडा ते मंगळवार तळे या रस्त्यावर पालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून दुमजली भाजी मंडई बांधली. ग्राहकांच्या गाड्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्यापाऱ्यांना आवश्यक असणाºया सर्व गोष्टी मंडईत उपलब्ध करून दिल्या. पूर्वी मंडईत पावसाळ्यात दुकानाच्या डोक्यावर प्लास्टिकची फाटकी कागदं बांधून भाजी विक्री केली जायची. काहीजण तर कोसळत्या पावसात डोक्यावर छत्री घेऊन व्यवसाय करत होते. अशा बिकट परिस्थितीत असलेल्या विक्रेत्यांना पालिकेने चकाचक मंडई बांधून दिली. पण रस्त्यावर बसण्यातच धन्यता मानणाºया काही मुठभर व्यावसायिकांमुळे अवघी मंडईच आता पुन्हा रस्त्यावरभरूलागलीआहे.

पालिकेची पावती फाडण्याची वेळ टळून गेल्यानंतर टोपल्या आणि हातगाड्या घेऊन ही मंडळी राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर बसतात. यामुळे वाहतुकीची कोंडी आणि किरकोळ अपघात यांची संख्या वाढत आहे.याबाबत दोन दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांनी विक्रेत्यांना रस्त्यावर न बसण्याचं आवाहन गत सप्ताहात केले होते.मात्र, पोलिसांची पाठ फिरली की मंडळी पुन्हा रस्त्यावर येऊन भाजी विक्री करत असल्याचे दिसून येत आहे.

राजवाडा मुख्य चौकात भाजी विकणारे काही टेम्पो आणि अलिकडे काही हातगाड्याही लाईट लावून पालेभाज्या विक्री करत असल्याचे दृष्टीस पडतात. यामुळेही येथे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. गत सप्ताहात कारवाईची आरंभशुरता केलेल्या पोलिसांना या विषयाचा आता विसर पडल्याचे जाणवते. रस्त्यावरील मंडईमुळे वाहतुकीची होणारी कोंडी फोडण्यापेक्षा येथील दादा पावत्या फाडण्यात आणि तरूणांना अडविण्यात व्यस्त असल्याचे दिसते. तर दुसरीकडे रस्त्यावर मंडई भरणं हा निव्वळ पोलिसांचाच विषय असून याकडे पालिकेने अक्षरश:दुर्लक्ष केले आहे. रस्त्यावर बसणाºया या व्यावसायिकांना येथे मज्जाव करण्यासाठी पालिकेतील कोणीच पुढे आले नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सातारा बाजार समितीतीलभाज्यांचे दर(प्र.१० किलो)वांगी-२००-२५०कोबी-८०-१००फ्लॉवर-२००-३००दोडका-४००-४५०कारली -४००-४५०कांदा-११०-१४०आले-३८०-४८०मिरची-२५०-३००पावटा-४००-४५०भेंडी-२५०-३२०शेवगा-३००-४००भु. शेंग-२५०-३००मेथी(प्र.१००)-९००-१०००कोथिंबिर-३००-४००

सकाळी फळे... रात्री भाजी...!राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर सकाळी हंगामी व्यावसायिक हातगाड्यांसह उभे असतात. गेल्या काही दिवसांत सकाळच्या सत्रांत येथे आंबा, पपई, जांभूळ, फणस आदी फळं विकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.दिवस मावळतीला आला की ग्रामीण भागातून येणारे व्यावसायिकांना घरी जाण्याची ओढ लागते तर मंडईतील व्यापारी रस्त्यावर येण्याच्या तयारीत असतात. संध्याकाळी साडेपाच नंतर कांदे, बटाटे, लसूण, दुधी भोपळा अशा भाज्या घेवून हे व्यापारी बसतात.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbusinessव्यवसायMarketबाजार