सातारा : केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी कायदे त्वरित रद्द करावेत शेतमालाला हमीभाव जाहीर करावा, या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सातारा जिल्ह्यात ठिकाणी मंगळवारी बंद पाळण्यात आला. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने सातारा शहरातून रॅली काढणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.जिल्ह्यातील सातारा, कराड, वाई, फलटण या प्रमुख शहरांसह इतर तालुक्यात बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. शहरातील रस्त्यांवर देखील वाहतूक रोडावली होती. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली.बाजार समित्यांचे कामकाज देखील पूर्णपणे ठप्प झाले. बाजार समित्यांच्या आवारामध्ये भयान शांतता पाहायला मिळाली. भाज्यांची आवक देखील झाली नाही. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेला शेतमाल वाहनांमध्ये अडकून पडला होता. माल घेऊन आलेली ही वाहने बाजार समितीच्या आवारात उभी होती. बाजार समितीतील व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्यात आली होती, त्यामुळे शेतमालाची खरेदी-विक्री होऊ शकले नाही.भारत बंदची घोषणा असली तरीदेखील एसटीच्या फेऱ्या सुरू होत्या. महामार्गावर ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कराडवरून पुणे, मुंबईला जाणारी वाहतूक मंदावली होती. पुण्याकडून साताऱ्याकडे येणारी वाहने काही प्रमाणात पाहायला मिळत होती.केंद्राने केलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात आघाडीतील घटक पक्षांनी मंगळवारी एकत्र येत घोषणाबाजी केली. विकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी सकाळी सातारा शहरातून रॅली काढली. अधिकारी कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली पोहना कडे निघाले असताना पोलिसांनी रस्त्यातच आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी महाविकास आघाडीच्या नरेंद्र पाटील, तेजस शिंदे आदी नेत्यांना ताब्यात घेतले. त्यानंतरही राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकाणी घोषणाबाजी देऊन केंद्र शासनाचा निषेध केला.भारत किसान मंचचे कॉम्रेड वसंतराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके, अर्जुनराव साळुंखे, रमेश पिसाळ आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने केली.
साताऱ्यात आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड, कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 12:50 PM
BharatBand, FarmarStrike, Police, Sataranews केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी कायदे त्वरित रद्द करावेत शेतमालाला हमीभाव जाहीर करावा, या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सातारा जिल्ह्यात ठिकाणी मंगळवारी बंद पाळण्यात आला. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने सातारा शहरातून रॅली काढणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
ठळक मुद्देसाताऱ्यात आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड, कामकाज ठप्प बाजार समित्यांच्या आवारामध्ये शांतता; जिल्ह्यात भारत बंदला शंभर टक्के प्रतिसाद