सातारा : अवैध व्यावसायिकांना पाठीशी घातल्याचा ठपका ठेवत तळबीड (ता. कऱ्हाड) पोलिस ठाण्यातील हवालदार जी. आर. बाकले यांना पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी निलंबित केले आहे. हवालदार बाकले यांच्याकडे तळबीड बीटची जबाबदारी सोपविली होती. या भागात अवैध व्यवसाय सुरू राहणार नाहीत, याबाबत त्यांना पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना केल्या होत्या. त्यांच्या बीटमधील बेलवडे हवेली आणि तळबीड गावांत चोरटी दारू विक्री होत असल्याबाबतची गोपनीय माहिती त्यांना देण्यात आली होती. त्यांना छापा टाकण्यास लेखी व तोंडी सांगितले होते. मात्र, बाकले यांनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले. बेशिस्त, बेजबाबदार, कर्तव्यात हलगर्जीपणा, तसेच वरिष्ठांचा आदेश न मानने, गैरवर्तन अशाप्रकारच्या आरोपांचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश देऊन बाकले यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले.
तळबीडचे पोलिस हवालदार बाकले निलंबित
By admin | Published: November 16, 2016 11:03 PM