ग्रामपंचायत निवडणुका निर्भय वातावरणात पार पडाव्यात, यासाठी खेड बुद्रुक येथे दंगा काबू पथकातील जवानांनी संचलन केले. यामध्ये अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. (छाया : संतोष खरात)
९९९९९९९९
पै-पाहुण्यांची भेट
सातारा : ग्रामपंचायत निवडणूक काही दिवसांवर आली असल्याने जास्तीत-जास्त मते मिळावीत, यासाठी अनेक कल्पना लढविल्या जात आहेत. यामध्ये पै-पाहुण्यांची भेट घेऊन आपल्याच उमेदवारांना मतदान करण्याबाबत आग्रह धरला जात आहे.
०००००००००
कंटेनमेंट झोनचा विसर
सातारा : लॉकडाऊन काळात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असलेल्या इमारत परिसरात कंटेनमेंट झोन तयार केला जात होता. यामध्ये आता बदल होत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी होत असल्याने प्रशासनानेही झोन तयार करण्याचे बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांमधील भीतीचे वातावरणही कमी होत आहे.
००००००
एटीएम सेंटर ओस
सातारा : जिल्ह्यातील अनेक एटीएम सेंटरमध्ये खासगी सुरक्षारक्षक नसल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा होत आहे. तसेच पाऊस पडत असल्याने कुत्रीही काहीवेळा या ठिकाणी जाऊन बसत असतात. त्यामुळे पैसे काढण्यासाठी आत जाण्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत आहे.
०००००ढ़
ट्रॅक्टरमधून कचरा
सातारा : साताऱ्यातील अनेक भागांत दररोज सकाळी घंटागाडी येत असते. तरीही शुक्रवारी दुपारी ट्रॅक्टरमधून कचऱ्याची वाहतूक केली जात होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरील टाकाऊ वस्तू त्यामध्ये टाकून दिल्या. त्यानंतर तो कचरा सोनगाव कचरा डेपोत टाकला.
००००००
दिवसाही पथदिवे सुरू
सातारा : साताऱ्यातील पोवई नाका ते जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील पथदिवे शुक्रवारी सकाळीही सुरू होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास दोन्ही बाजूचे दिवे सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. याबाबत काहीजणांनी संबंधित विभागाला मोबाईलवरुन माहिती देण्याचाही प्रयत्न केला.
००००००
शाळा बंद असल्याने मुलंही कंटाळली
सातारा : कोरोनानंतर मार्चपासून जिल्ह्यातील सर्वच शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा बंद असल्याने मुलं घरात असून, त्यांना मैदानावरही जाता येत नव्हते. आता मैदाने सुरू केली आहेत; मात्र सवंगड्यांची भेट होत नसल्याने नागरिक कंटाळले आहेत. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
००००००
पावसामुळे घसरगुंडी
सातारा : साताऱ्यातील अनेक भागांत रस्त्याचे काम झाले आहे. त्यामुळे वाहने सुसाट धावत असतात. मात्र पावसामुळे रेती वाहून आली आहे. त्यामुळे दुचाकी वाहने वळणावर घसरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
००००००
ओढ्यात घाण
सातारा : सातारा शहरातून मोठ्या प्रमाणावर ओढे वाहत आहेत. त्यातील अनेक ओढ्यांच्या कडेला वसाहती आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवासी ओढ्यातच कचरा टाकत असतात. पालिकेने अनेक ओढ्यांवर तारेची जाळी बसविली आहे. तरीही अनेक ठिकाणच्या ओढ्यांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य तयार होत आहे.
००००००
पिशव्यांसाठी पोते
सातारा : कापड दुकानांतील वस्तू प्लास्टिकच्या पोत्यात बांधून येत असतात. या पोत्यापासून आता अनेक व्यापाऱ्यांनी पिशव्या बनवून घेतल्या आहेत. या पिशव्यांमधूनच ग्राहकांना वस्तू दिल्या जातात. त्यामुळे आजवर टाकून दिल्या जात असलेल्या वस्तूंचा वापर चांगल्या कामासाठी होऊ लागल्याने कौतुक होत आहे.
००००००००००ढ़
सैदापूर रस्त्यावर धोका
सातारा : सातारा-सैदापूर रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या कामासाठी आणून ठेवलेली माती, रेती, दगड-गोटे रस्त्याच्या कडेलाच पडलेले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांमध्ये अपघातांचा धोका व्यक्त केला जात आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
०००००००००००
कपड्यांचे वाटप
सातारा : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी साताऱ्यात बुधवारी गरीब, अनाथ लोकांना थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून कपड्यांचे वाटप केले. यावेळी अतिश ननावरे, शिवाजी सावंत, नंदू केसरकर, नीलेश मोरे, नीलेश चित्रगार, बाबा गुजर उपस्थित होते.
०००००००००
कोरोना लसीकरणाबाबत उत्सुकता
सातारा : कोरोनावर लस शोधण्यात यश आले असून, ती देण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र ही लस कशाप्रकारची असेल, याची उत्सुकता लागून राहिली आहे. ही लस तोंडातून थेंब पद्धतीने देण्यात येणार आहे की, इंजेक्शनद्वारे याबाबत काहीही ठोस सांगितले जात नसल्याने लसीकरणाबाबत सर्वत्र चर्चा रंगायला लागली आहे. याबाबत उत्सुकता लागली आहे.
०००००००००
यात्रांवर परिणाम
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील यात्रांवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खेळणी, खाऊचे गाडे, किरकोळ विक्रेत्यांवर परिणाम झाल्याचे जाणवत आहे. या व्यावसायिकांना घरातच बसावे लागत असल्याने चांगला हंगाम हातातून गेला आहे.
००००००
हेल्मेट सक्ती गरजेची
पाचगणी : महाबळेश्वर, पाचगणी ही जागतिकस्तरावरील पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे येथे विविध भागातून पर्यटक येत असतात; मात्र येथील स्थानिकच दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करत नाहीत. त्यामुळे अपघातात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. साहजिकच हेल्मेट सक्ती करण्याची मागणी होत आहे.
००००००
एसटी महामंडळाचा यात्रांचा हंगाम वाया
सातारा : सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील सिद्धनाथ, पाल येथील खंडोबा यात्रा, मांढरगडावरुन मांढरदेवाची यात्रा दरवर्षी याच काळात होत असते. त्यामुळे अनेक भाविक एसटीनेच त्या ठिकाणी येत असतात. यासाठी एसटी महामंडळाच्या विविध आगारांतून जादा गाड्या सोडल्या जातात. त्यातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे एसटीचा हंगाम वाया गेला आहे.