फलटण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहरामध्ये पोेलिसांकडून संचलन करण्यात आले. तसेच पोलीस परेड मैदानावर जातीय दंगा काबू योजनेचा सराव सातारा पोलीस मुख्यालयातील कवायत निर्देशाकांच्यामार्फत घेण्यात आला.
यावेळी फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे व धन्यकुमार गोडसे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. फलटण शहरातील महात्मा फुले चौक, गजानन चौक, श्रीराम मंदिर, शिवशक्ती चौक, बारामती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ चौक, स्व. अशोकराव भोईटे चौक (डेक्कन चौक) व पुन्हा महात्मा फुले चौक असे संचलन करण्यात आले.