पाचगणी : कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व रमजान ईद आणि सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द निकाल या पार्श्वभूमीवर बुधवारी पाचगणी शहरात पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार या नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि शहरात शांतता राहावी, यासाठी पाचगणी पोलिसांनी शहरातून संचलन केले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रमजान ईद, लॉकडाऊन असतानाही लोकांची बाजारपेठत गर्दी वाढू लागल्याने, तसेच सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याचा निकाल जाहीर केल्याने, त्याचे कोठेही पडसाद उमटू नयेत आणि कोरोना नियमांचे पालन व्हावे. शासन ऐका बाजूने नियम कडक करून लोकांची गर्दी कमी करण्यासाठी आग्रही असताना, दुसरीकडे मात्र जनता या लॉकडाऊनने हतबल झाली आहे. यातूनच आपल्या शहराला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे आणि विनाकारण गर्दी करू नये, यासाठी पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून यामध्ये बाजारपेठ टेबललँड नाका, गावठाण, या ठिकाणी संचलन केले. यामध्ये एक अधिकारी २१ पोलीस व चार होमगार्ड सहभागी झाले होते.
०५पाचगणी संचलन
पाचगणी येथे दंगा काबूअंतर्गत शहरातून पोलीस संचलन करण्यात आले.