सातारा : सातारा जिल्'ात मोठ्या प्रमाणात यात्रा, धार्मिक उत्सव होत असतात. त्यामुळे वर्षभर कोणत्या ना कोणत्या कारणांना लोकांची गर्दी होत असते. अशा वेळी गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलीस खात्यासाठी जिकिरीचे काम असते. यासाठी सातारा पोलीस दलात दोन ड्रोन कॅमेरे दाखल झाले आहेत. त्यांच्या सा'ाने प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
सातारा जिल्'ाला ऐतिहासिक वारसा आहे. जिल्'ात अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत. त्याचबरोबर धार्मिक व पर्यटनस्थळांचीही मोठी संख्या आहे. त्यामुळे विविध धार्मिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक उत्सवाला राज्यभरातील पर्यटकांची गर्दी असते. अशा वेळी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांवर असते. गर्दीच्या वेळी सातारा जिल्हा पोलीस दलाला इतर जिल्'ातून पोलीस फौजफाटा मागवावा लागतो. अनेक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवताना पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते.
सातारा जिल्'ात पंढरपूरची वारी, मांढरदेवी, पालीचा खंडोबा, औंध, सिद्धेश्वर आणि शिंगणापूर येथील यात्रा उत्सवाला मोठी गर्दी होत असते. काही वर्षांपूर्वी मांढरदेवी व पालीचा खंडोबा यात्रेत गर्दीत दुर्घटना घडली होती. अशा स्वरुपाच्या घडना घडल्यास त्या नियंत्रित करण्यास पोलिसांना मदत होणार आहे.गर्दीतील गुन्हेगारांवर लक्ष्यमोर्चे, आंदोलन हे बहुतेक वेळा हिंसक वळण घेत असतात. तसेच यात्रा, उत्सवादरम्यान, गर्दीच्या फायदा घेऊन लुटणारी, चोरी आणि चेंगराचेंगरीसारख्या घटना होत असतात. त्यावेळी गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष्य ठेवून त्यांना जेरबंद करण्यास मदत होणार आहे.स्मार्ट पोलिसांसाठी फायदासातारा जिल्'ात पोलीस दलात पाच लाख रुपये किमतीचे दोन ड्रोन कॅमेरे दाखल झाले आहे. हे कॅमेरे कशा प्रकारे वापरावे, याचे कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले आहे. स्मार्ट पोलिसिंग करताना फायदा होईल.संदीप पाटील जिल्हा पोलीस अधीक्षकगर्दीवर पोलिसांची आता हवाई गस्त : सातारा जिल्'ातून ज्ञानेश्वर पालखी सोहळा जातो. यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात. तसेच काही वेळेत मोर्चात बंदोबस्त करताना पोलिसांना मोठी ताकद खर्ची करावी लागते. यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेरे खरेदी केले आहेत. या ड्रोनच्या माध्यमातून हवाई गस्त घालणे सोपे जाणार आहे.