याबाबत पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील यांच्याकडे त्यांनी निवेदन सादर केले आहे. यावेळी रत्नमाला पाटील व सोनटक्के या उपस्थित होत्या. निवेदनात म्हटले आहे की, महिला दिन हा केवळ बैल पोळा, बेंदूर न राहता त्यादिवशी निराधार व परित्यक्ता महिलांना केंद्रस्थानी ठेवून आकृतिबंध व कृतिशील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात यावे. वैचारिक व निर्भीड महिला सुरक्षित आहेत. मात्र, ग्रामीण भागातील परित्यक्त्या व निराधार महिलांच्या सुरक्षेची काळजी वाटते. त्या महिला घर आणि धुणीभांडी एवढ्यापुरत्या मर्यादित आहेत. तसेच त्या अजून चूल आणि मूल या संकल्पनेबाहेर आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांचे हक्क, अधिकार व कायदा समजणे तितकेच महत्त्वाचे आहे. याकामी महिला सुरक्षा समिती व निर्भया पथक काम करत आहे. त्या जोडीस ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षा जाणीव जागृतीची मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. पोलीस यंत्रणेने आकृतिबंध कार्यक्रम हाती घेऊन दर तीन महिन्यास ग्रामीण भागात महिला सुरक्षा जाणीव जागृती मोहीम राबवावी. यामध्ये स्थानिक ग्रामस्थ व पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग असावा. महिलांना त्यांचे हक्क, अधिकार व कायदे याची माहिती समजावून सांगावी. जेणेकरून समाजासमोर पोलीस वर्दीचा धाक राहिल्याने महिला अत्याचाराच्या घटना कमी होतील, असेही निवेदनात म्हटले आहे.
महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी जनजागृती करावी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 5:10 AM