शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

९९ गावांमध्ये पोलीस पाटील पद रिक्त

By admin | Published: September 18, 2015 10:35 PM

फलटण तालुका : २६ ठिकाणी कार्यरत; भरतीसाठी आरक्षण निश्चित

फलटण : ‘फलटण तालुक्यातील ९९ गावांमधील पोलीस पाटील पदे रिक्त असून, केवळ २६ गावांत पोलीस पाटील कार्यरत आहेत. ९९ गावांमध्ये पोलीस पाटील नियुक्ती करण्यासाठी गुरुवारी संबंधित गावांतील या पदाची आरक्षणे निश्चित करण्यात आली. त्या गावातील पोलीस पाटील पद नियुक्तीचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होणार आहे,’ अशी माहिती प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली.निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणानुसार ३८ गावांतील पोलीस पाटील पदे सर्वसाधारण गटासाठी खुली राहिली आहेत. १६ गावांतील पदे सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षित आहेत. १३ गावांतील पदे इतर मागासवर्गीयांसाठी तर पाच गावांमधील पदे इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तीन गावांमधील पदे अनुसूचित जाती महिलांसाठी, तीन गावांमधील पदे अनुसूचित जमाती महिलांसाठी, सात गावांमधील पदे अनुसूचित जातीसाठी, सहा गावांमधील पदे अनुसूचित जमातीसाठी, विमुक्त जाती, अ. भ. ज. ब. (महिला), भ. ज. ड. (महिला), भ.ज.ड. वि. मा. प्र., वि. मा. प्र. (महिला) यासाठी प्रत्येकी एका गावातील भ. ज. ब. साठी दोन गावांमधील पदांची आरक्षणे निश्चित करण्यात आल्याचे प्रांताधिकारी जाधव यांनी सांगितले आहे.खुल्या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या गावामध्ये हिंगणगाव, तिरकवाडी, आरडगाव, सोनवडी बुद्रुक, पिंपळवाडी, सरडे, ढवळ, कुरवली खुर्द, कुरवली बुद्रुक, तांबवे, वाघोशी, रावडी बुद्रुक, वडले, फडतरवाडी, ढवळेवाडी, पिंप्रद, ठाकुरकी, विडणी, भाडळी खुर्द, तडवळे, सुरवडी, गिरवी, मिरढे, झिरपवाडी, चांभारवाडी, चौधरवाडी, वाजेगाव, विठ्ठलवाडी, चव्हाणवाडी, ठाकळवाडे, खराडेवाडी, फरांदवाडी, हनुमंतवाडी, ढवळेवाडी (आसू), मिऱ्याचीवाडी (दालवडी) व होळ आदींचा समावेश आहे.खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असलेल्या गावांमध्ये शेरेचीवाडी (हिंगणगाव), मुळीकवाडी, सासवड, बिबी, शेरेचीवाडी (ढवळ), आदर्की खुर्द, माळेवाडी, (कुसूर), धुमाळवाडी, नाईकबोमवाडी, शेरे शिंदेवाडी, सोनवडी खुर्द, डोंबाळवाडी, बोडकेवाडी, शिंदेनगर, भाडळी बुदु्रक, मठाचीवाडी या गावांचा समावेश आहे.इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या गावांमध्ये वाखरी, पवारवाडी, गोखळी, राजुरी, दत्तनगर, नांदल, वडगाव, मलवडी, सांगवी, धुळदेव, विंचुर्णी, मिरगाव आणि काशीदवाडीचा समावेश आहे. इतर मागास प्रवर्गासाठी भवानीनगर, भिलकटी, टाकुबाईचीवाडी, खडकी आणि सासकल या गावांचा समावेश आहे. अनुसूचित जाती महिलासाठी राखीव गावामध्ये वडजल, जाधववाडी (आसू) आणि पिराचीवाडी, अनुसूचित महिलांसाठी राखीव असलेल्या गावांमध्ये आंदरुड, आदर्की बुद्रुक व राजाळे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या गावांमध्ये घाडगेवाडी, वेळोशी, शिंदेवाडी, कोरेगाव, कुसूर, कोऱ्हाळे, व मुरुम. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या गावामध्ये बरड, अलगुडेवाडी, साठे, उपळवे, घाडगेमळा व ताथवडा या गावांचा समावेश आहे.वि. जा. (भ) काळज, भ. ज. (ब) (म्हिला) कोळकी, भ. ज. (ब) तरडगाव, मुंजवडी, भ.ज. (ड) (महिला) खुंटे, भ. ज. (ड) कांबळेश्वर. वि. मा. प्र. वाठार निंबाळकर, वि. मा. प्र. (महिला) निंबळक या गावांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)कोतवालांची पदे भरणार...फलटण तालुक्यातील सहा सजातील कोतवालांची रिक्त पदे जात प्रवर्गानुसार भरण्यात येणार आहेत. कोतवाल म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या संबंधित गावातील व्यक्तीने दि. २१ पर्यंत तहसील कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन तहसीलदार विवेक जाधव यांनी केले आहे. कोतवालपद भरण्यात येणाऱ्या गावांचे नाव व तेथील जाती प्रवर्गांचे आरक्षण पुढीलप्रमाणे पवारवाडी व वडले (अनुसूचित जाती), मुंजवडी (इतरमागास), कापडगाव (खुल्या प्रवर्गातील महिला) सांगवी व फलटण (खुला प्रवर्ग). या पदासाठी बारावी उत्तीर्ण, एम. एस. सी.आय.टी संगणक अर्हता प्रमाणपत्र आवश्यक आहे. १८ ते ४० वर्षे वयोमर्यादा, राखीव जागाबाबत सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच गावचे भौगोलिक क्षेत्राचे राजकीय व सामाजिक परिस्थितीचे ज्ञान आवश्यक आहे.