शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, सामाजिक मान-सन्मान मिळाल्याने प्रसन्न वाटेल
3
T20 World Cup: न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी विजय
4
ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल?
5
मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय
6
विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!
7
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
8
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
9
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
10
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
11
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
12
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
13
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
14
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
15
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
16
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
17
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
18
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
19
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
20
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...

ऊस पळवापळवीचे धोरण घातक

By admin | Published: September 25, 2016 11:53 PM

शंभूराज देसाई : साखर कारखान्याची ४६ वी वार्षिक सर्वसाधरण सभा

पाटण : ‘लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या उत्तर व दक्षिणेस खासगी साखर कारखान्यांचे पेव फुटले असून, त्यांचे देसाई कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाच्या पळवापळवीचे धोरण व अतिक्रमण घातक आहे. ते थांबवावे लागणार आहे. त्यासाठी संचालक व ऊस उत्पादक सभासद यांच्यात समन्वय ठेवा,’ असे आवाहन देसाई कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शंभूराज देसाई यांनी केले. देसाई कारखान्याच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. आ. देसाई म्हणाले, ‘चालू हंगामात राज्यातील ५० टक्के कारखाने ऊस टंचाईमुळे बंद राहण्याची भीती आहे. आघाडी शासनाने सहकारी कारखानदारी मोडीत काढून तेच कारखाने खासगी तत्त्वावर स्वत:च्या नातेवाईक व बगलबच्च्यांना चालविण्यास दिले आहेत. साखरेला चांगला भाव मिळावा म्हणून राज्यातील सर्व कारखानदारांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांकडे गेले पाहिजे. देसाई कारखान्याची ४५ वर्षे जुनी मशिनरी असून, यावर्षीच्या हंगामासाठी ७० टक्के नूतनीकरण केले जाणार आहे. यावर्षी पावणे दोन लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी दिवसाला २००० टन उसाचे गाळप झाले पाहिजे आणि पावणेबारा साखर उतारा मिळाला पाहिजे.’ यावेळी रवींद्र भाकरे, बळवंत जानुगडे , बाळकृष्ण पवार यांचा चांगले ऊस उत्पादक म्हणून सत्कार करण्यात आला. सभेस रविराज देसाई, कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील, उपसभापती डी. आर. पाटील सर्व संचालक सभासद व शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी) एफआरपी देऊनसुद्धा कारखाना फायद्यात ‘गतवर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देऊनसुद्धा देसाई कारखान्यास गत हंगामात साडेचार लाख रुपये नफा गेल्यावर्षीच्या तुलनेत जादा झाला आहे. बाकीच्या कारखान्यांनी एफआरपीचे १००० रुपये थकविले आहेत,’ असे देसाई यांनी सांगितले. विमान बनविण्याऱ्या कॅप्टनचे कौतुक... साळवे, ता. पाटण गावचे सुपुत्र कॅप्टन अमोल यादव यांनी विमान बनविले. त्याचा सत्कार झाला. यावेळी कॅप्टन यादव म्हणाले, ‘मी भारतात पहिले विमान बनविले. त्याचे राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. आता २०० एकर जमीन व ३०० कोटी रुपये देऊन विमान बनविण्याचा कारखाना तयार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. विरोधकांना कारखाना उभा करता आला नाही ‘विरोधकांनी देसाई कारखान्याच्या निवडणुकीत पडद्यामागून पॅनेल उभे करून राजकारण केले. त्यामुळे २५ लाखांचा खर्च कारखान्याला झाला आणि हीच मंडळी आता देसाई कारखान्याचा ऊस बाहेर घालण्यासाठी सज्ज आहे. मात्र, त्यांना स्वत:चा कारखाना अद्याप उभा करता आलेला नाही,’ अशी टीका आ. देसाई यांनी केली.