खंडाळा : नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकसाठी काँगे्रस आणि राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली आहे. शिवसेना, भाजपाची आजपर्यंत भूमिका गुलदस्त्यात होती. मात्र, भाजपापाठोपाठ शिवसेनेही पॅनेलसाठी स्वतंत्र मुलाखती घेऊन रंणागणाची तयारी केली. त्यामुळे खंडाळ्यात नगरपंचायतीसाठी चौरंगी लढती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आजतागायत गटातटाच्या तटबंदीखाली सुरू असणारे राजकारण पहिल्यांदाच पक्षीय पातळीवर रंगणार असल्याने मोठी चुरस होण्याची चिन्हे आहे. खंडाळ्यात परंपरागत दोन गटांत शहराचे राजकारण एकवटले जात होते. मात्र, हे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी निगडीत असले तरी स्थानिक पातळीवर भावकीच्या राजकारणामुळे तांत्रिक बदलही दिसत होते; पण खंडाळ्याला स्वतंत्र नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला आणि गावच्या राजकीय पटलावर पक्षीय भूमिका बळावत गेली. त्यातच सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तुल्यबळ लढती होतील, असे घटत असतानाच भाजपाने सर्व जागांसाठी स्वतंत्र पॅनेलची तयारी चालविली आहे. त्यासाठी आठवड्यापूर्वीच इच्छुकांच्या मुलाखती घेऊन त्यांना आपापल्या प्रभागात कामाचे आदेशही दिले आहेत.शिवसेनेची ासलेली संथ भूमिका अर्ज भरण्याचे दिवस सुरू होताच वेगाने धावू लागली आहे. सेनेच्या पक्षनिरीक्षकांनी प्रभागवार उमेदवारांच्या मुलाखती घेऊन शिव संघटन बांधण्यास सुरुवात केली आहे. पक्षाने लक्ष दिल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्येही चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे खंडाळ्याच्या राजकारणात भाजपा-शिवसेनेने निर्णायक भूमिकेकडे वाटचाल सुरू करून प्रस्थापितांना दे धक्का तंत्र देण्यास सुरुवात केला आहे.वास्तविक खंडाळ्यातील काँग्रेसच्या सत्तागडाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादीनेही आपल्या तोफांचे बार भरण्यासाठी रात्रंदिवस एक केला आहे. तरुण फळीच्या संघटनेच्या जोरावर काँग्रेसच्या बुरुजाला हात घालण्याची खेळी राष्ट्रवादीकडून केली जाऊ शकते. (प्रतिनिधी)सेनेची बांधणी...खंडाळ्यातील १७ प्रभागांसाठी शिवसेनेचे पक्ष निरीक्षक डॉ. योगेश जाधव यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या पालकमंत्री विजय शिवतारे, नितीन बानगुडे-पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सेनेचे स्वतंत्र पॅनेल उभे करण्यासाठी मोठी बांधणी सुरू आहे. यासाठी शिवसेना शहर प्रमुख मंगेश खंडागळे यांनी व्यूहरचना केले आहे.भाजपा आघाडी...या निवडणुकीसाठी भाजपाने अगोदरच पॅनेलचे उमेदवार निश्चित केले आहेत. बुधवारी एकत्रितरीत्या अर्ज दाखल करून निवडणूक आघाडीवर राहण्याचा प्रयत्न अभिजित खंडागळे यांच्याकडून केला जाऊ शकतो.
गटातटाच्या तटबंदीखाली पक्षीय राजकारण
By admin | Published: October 26, 2016 10:54 PM