शहरं
Join us  
Trending Stories
1
झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट
2
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
3
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र
4
Baba Siddique : 'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
5
बाबा सिद्दिकींची संपत्ती किती? ईडीने ४६२ कोटींची मालमत्ता जप्त केलेली, सहा महिन्यांपूर्वीच आले राष्ट्रवादीत
6
Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'
7
'नेत्यांची दिवसाढवळ्या हत्या होणं म्हणजे महाराष्ट्रातील गृहखातं फेल'; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांच्या खात्याला फटकारलं
8
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
9
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
10
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
11
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
12
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
13
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन
14
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
15
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
16
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
17
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
18
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
19
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
20
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ

पाण्याअभावी पिके पडली पिवळी

By admin | Published: March 08, 2017 11:31 PM

कोरेगाव उत्तर : वसनेच्या पहिल्या टप्प्यातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी

वाठार स्टेशन : कायम दुष्काळाच्या छायेत असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात सध्या वाढत्या उन्हामुळे जमिनीतील पाणी पातळी खालावत चालली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाई निर्माण झाल्याने या परिसरातील उसाची पिके पाण्याअभावी करपून जाऊ लागली आहेत. या पिकांना आठवड्यात पाणी उपलब्ध झाले नाही तर या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. यासाठी वसना उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात हक्काची कोणतीच पाणी योजना नसल्याने या भागातील शेतकरी ग्रामस्थांना पाणीटंचाईशी नेहमीच संघर्ष करावा लागत आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार या भागात प्रमाणापेक्षा पावसाचे प्रमाण कमी आहे. या ठिकाणची संपूर्ण शेती व्यवस्था ही विहिरीवरील पाण्यावरच अवलंबून आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत या परिसरात झालेल्या कूपनलिकांमुळे या संपूर्ण भागाचे पाणी २५० ते ३५० स्के. फुटापर्यंत खाली गेले आहे. या भागातील वाठार स्टेशन सारख्या गावास कायमस्वरुपी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत पाण्यासाठी संघर्ष करूनही या भागाला अद्याप कोणत्याही प्रकारचे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही.चालू वर्षी मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता वाढली असून, विहिरींमधील पाणीसाठा कमी होत चालला आहे. यामुळे देऊर परिसरातील उसाचे पीक आता धोक्यात आले आहे. पिके वाचविण्यासाठी वसनेच्या पहिल्या टप्प्यातून पाणी सोडले तर या भागची पीक परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न थोड्याफार प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. (वार्ताहर)