सातारा : प्रत्येक घटकाच्या मदतीला धावून जाणारा मराठा बांधव नेहमीच मोठ्या बंधूच्या भूमिकेत राहिलेला. हीच भूमिका मराठा महामोर्चाच्या निमित्ताने जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनाही अनुभवयाला मिळाली. पितृपंधरवड्यामुळे बाजारपेठेत नेहमीप्रमाणे मंदी असतानाही महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याच्या बाजारपेठेने उसळी मारली. लाखो रुपयांची उलाढाल अनेक वस्तूंमुळे होत आहे. पितृपंधरवड्यात कोणतेही मोठे व्यवहार केले जात नाही. नवीन वस्तूंची खरेदी शक्यतो टाळली जाते. पंधरा दिवसांचा हा कालावधी बाजारपेठेत ‘स्लॅक सिझन’ म्हणून ओळखला जात असला तरी मराठा महामोर्चात सहभागी होण्यासाठी गावोगावी जय्यत तयारी सुरू आहे. प्रचार साहित्यांची आवक बाजारात वाढल्याने मोठी उलाढाल सुरू आहे.वाहनांवर रेडियमपासून स्टिकर लावले जात आहेत. त्यामुळे आजवर हातावर हात ठेवून बसलेल्या रेडियम कलाकारांना चांगले दिवस आले आहेत. तरुणी काळ्या रंगाचे पेहराव घालून सामील होणार आहेत. त्यामुळे गावोगावच्या कापड दुकानांमध्ये या दिवसामध्येही कपडे विक्रीस आले आहेत. साताऱ्यातील तरुणही काळे टी-शर्ट घालणार आहेत. कोणत्याही आंदोलनात गांधी टोपी घालण्याची क्रेझ आली आहे. लाखोंच्या संख्येने गांधी टोपी खरेदी करून त्यावर ‘एक मराठा, लाख मराठा’ हे लिहिले जात आहे. (प्रतिनिधी)प्रत्येकालाच हवेत मोठे झेंडेमहामोर्चात जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून मराठा समाज बांधव सामील होणार आहे. मोर्चेकऱ्यांनी मोर्चात मोठ-मोठे झेंडे घेऊन सामील होणार आहेत. त्यामुळे कापड दुकानातून कापड खरेदी करून शिलाईच्या दुकानातून झेंडे शिवून घेतले जात आहेत. महामोर्चाला सहा दिवस शिल्लक राहिल्याने या कामांना आत्तापासूनच वेग आला आहे. महाकाय बॅनरगावागावचे बसस्थानक, बाजारपेठेच्या मुख्य ठिकाणी मराठा महामोर्चाचे बॅनर लावले जात आहेत. हे बॅनर बनविण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे. कोणतीही निवडणूक नसल्याने हे व्यवसायही बंद पडले होते.
पितृपंधरवड्याची मंदी बाजारपेठेतून गायब
By admin | Published: September 28, 2016 12:06 AM