'साई सावंत - कोंडवे --यंदा वेळेत दाखल झालेल्या मान्सूनशी दोन हात करण्याची तयारी झोपडपट्टीधारकांनी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काट्या आणि पत्र्यापासून अवघ्या पाच फूट उंचीलाही आता प्लास्टिक कागद आणि जुन्या साड्यांच्या साह्याने झाकून ठेवून पावसाला घरात येण्यापासून वाचविण्याचे तात्पुरते प्रयत्न या गरिबांनी केले आहेत.गोडोली येथील सुशोभीत तलावाच्या शेजारी गेल्या काही महिन्यांपासून काही लोक झोपड्या टाकून राहू लागले आहेत. आपल्या चिल्ल्या-पिल्ल्यांसह थंडीचा कडाका संपल्यानंतर आलेल्या या पाहुण्यांना यंदा पहिल्यांदाच पावसाची झलक पाहायला मिळणार आहे. गोडोली तळ्याच्या शेजारी काही झोपड्या उभ्या आहेत. या झोपड्यांमध्ये किमान वीस ते पंचवीस जण राहतात. त्यात काही चिमुरड्यांचाही समावेश आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी या कुटुंबातील महिला आणि पुरुषांनी प्लास्टिक कव्हर, फ्लेक्स आणि साड्यांचा आधार घेतला आहे. फ्लेक्स आणि प्लास्टिक कव्हरमुळे पाणी आत येण्यास अटकाव होत आहे.
गरिबांच्या झोपडीला आधार प्लास्टिक अन् साड्यांचा...
By admin | Published: June 12, 2015 10:24 PM