कऱ्हाड : कऱ्हाड हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका. या उपविभागात सुमारे तीनशे गावे आहेत. लोकसंख्याही ५ लाखांच्या घरात आहे; पण लोकसंख्येच्या तुलनेत येथील पोलीस मनुष्यबळ अत्यल्प आहे. दीड हजार नागरिकांमागे एक पोलीस अशी येथील सरासरी असून सुमारे पन्नास चौरस किलोमीटर कार्यक्षेत्रात फक्त चार पोलीस स्टेशन कार्यरत आहेत.
कऱ्हाड शहराच्या विस्ताराला मर्यादा आहेत. मात्र, शहरालगतची उपनगरे सध्या झपाट्याने विस्तारत आहेत. सैदापूर, विद्यानगर, ओगलेवाडी परिसर आणि विजयनगर येथे शैक्षणिक संकुले उभी राहत आहेत. परिणामी, या उपनगरांमध्ये विद्यार्थ्यांसह नागरिकांचाही ओढा आहे. कोयना वसाहत, मलकापूर येथील विस्तारत असलेले ऑटोमोबाइल क्षेत्रही सध्या विकासाला पोषक ठरत आहे. उपविभागात तासवडेची औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीत अनेक कंपन्या सुरू आहेत.
उंब्रज, मसूर, ओंड, उंडाळे, तांबवे, कोळे यासारखी बाजारपेठेची गावेही याच उपविभागात आहेत. या गावांसह अन्य काही गावे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्याही जिवंत मानली जातात. संबंधित गावांमध्ये वाढत असलेले अवैध धंदे सध्या पोलिसांची डोकेदुखी आहे. तसेच उपनगरांतील वाढती वसाहतही पोलिसांसमोर नवे आव्हान उभे करीत आहे.
- चौकट
बाजारपेठेच्या गावांची लोकसंख्या
कऱ्हाड शहर : ९८ हजार
मलकापूर : ३५ हजार
उंब्रज : १६ हजार
सैदापूर : २१ हजार
मसूर : ९ हजार
ओगलेवाडी : २० हजार
तांबवे : ९ हजार
उंडाळे : ५ हजार
- चौकट
कार्यक्षेत्रातील गावे
कऱ्हाड शहर : २३
कऱ्हाड ग्रामीण : १२९
तळबीड : १२
उंब्रज : १११
- चौकट
उपविभागातील दूरक्षेत्र
१) नांदगाव
२) उंडाळे
३) वडगाव हवेली
४) रेठरे बुद्रूक
५) कोळे
६) मसूर
७) चाफळ
८) तारळे
- चौकट
पोलीस मनुष्यबळ
उपअधीक्षक : १
निरीक्षक : ३
सहा. निरीक्षक : ८
उपनिरीक्षक : ११
कर्मचारी : ३६४
- चौकट
कऱ्हाड उपविभागात...
गावे : २७५
ग्रामपंचायती : २३०
लोकसंख्या : ६ लाख (सुमारे)
एकूण पोलीस : ३८६
- चौकट
विशेष शाखा, कार्यालयीन कामासाठीही नेमणूक
प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, क्राइम कक्ष, गोपनीय शाखा, मुद्देमाल कक्ष अशा वेगवेगळ्या शाखा असतात. तसेच कार्यालयीन कामासाठीही कर्मचाऱ्यांची नेमणूक असते. उपलब्ध कर्मचाऱ्यांमधील किमान एक चतुर्थांश कर्मचारी वेगवेगळ्या शाखा आणि कार्यालयीन कामासाठी असतात.
फोटो : २४केआरडी०४
कॅप्शन : प्रतीकात्मक