शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

सकारात्मक विचार समाजहितैषी

By admin | Published: December 23, 2014 9:33 PM

प्रल्हाद पै : ओघवत्या शब्दांनी श्रोते झाले मंत्रमुग्ध-- लोकमत माध्यम प्रायोजक

सातारा : ‘चांगले विचारच समाजाला बदलू शकतात. त्यामुळे मनात येणाऱ्या विचारांचा विचार करत राहा. वाईट विचार बाजूला सारुन चांगले विचार आत्मसात करा. हे विचारच प्रत्येकासाठी पोषक असून त्याबाबत प्रत्येकाने सावध असले पाहिजे,’ असे विचार प्रल्हाद पै यांनी येथे व्यक्त केले.जीवन विद्या मिशन शाखा, सातारा व सु-स्वराज्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात पै यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक होते. प्रल्हाद पै यांनी ‘व्यवस्थापन जीवनाचे’ व ‘उत्कर्ष एक प्रवास’ या व्याख्यानांच्या माध्यमातून श्रवणीय शब्दांत उपस्थित श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, संयोजक चंद्रशेखर चोरगे, उद्योजक श्रीराम दीक्षित, पंकज गांधी, संजय चंदूरकर, राजेश कोरपे, शिरीष खुटाळे, सचिन कलाणी, श्रीकांत पवार, युवराज पवार, भरत शेठ, सारंग खिरे, अलोक गांधी, शैलेश दिडवई, डॉ. अच्युत गोडबोले यांच्यासह राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, व्यापारी क्षेत्रातील असंख्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रल्हाद पै म्हणाले, ‘जीवनविद्येच्या शिकवणुकीमुळे कायिक, आर्थिक, मानसिक व वाचिक संपत्ती वाढल्याची उदाहरण जागोजागी पाहायला मिळतात. लहान मुलांना या शिकवणुकीची मोठी गरज आहे. या शिकवणुकीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या. मन परिवर्तन करण्याचे सामर्थ्य या शिकवणुकीत आहे. अंधश्रध्दा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचं सामर्थ्य या शिकवणुकीत आहे.’यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत पै म्हणाले, ‘आम्ही धर्माचा प्रचार करत नाही, आम्ही सत्कर्मावर श्रद्धा ठेवा, असे सांगतो. आता देशातील सुमारे ४२ कोटी तरुणांसाठी चांगले काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ अशी माहिती प्रल्हाद वामनराव पै यांनी दिली. प्रल्हाद पै म्हणाले, ‘आमच्याकडे येणाऱ्या लोकांत सुधारणा होत आहे. आम्ही ज्ञानातून लोकांच्यात बदल करत आहोत. (प्रतिनिधी)चोरगे परिवारातर्फे कारचे वितरणजीवन विद्या मिशनचे साताऱ्यातील नामधारक व या कार्यक्रमाचे संयोजक चंद्रशेखर चोरगे व त्यांच्या परिवाराने वामनराव पै यांच्या विचारांच्या प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने सातारा जिल्ह्यासाठी ओमनी गाडी भेट दिली. यापूर्वीही त्यांनी मिशनच्या कार्यासाठी मोठी गाडी भेट दिली होती.