शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

तासगाव पालिकेवर संजयकाकांची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2015 12:47 AM

नगराध्यक्षांचा राजीनामा : राष्ट्रवादीला हादरा, १८ पैकी १६ नगरसेवकांकडून अविश्वास ठराव दाखल

तासगाव : खासदार संजयकाका पाटील यांच्या चाणक्यनीतीमुळे सोमवारी तासगाव नगरपालिकेत त्यांचा गट सत्तेत आला. काँग्रेसचे नगराध्यक्ष अजय ऊर्फ संजय पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सादर केला. तत्पूर्वी, खासदार पाटील समर्थक नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला. पालिकेतील १८ पैकी १६ नगरसेवकांनी अविश्वास ठरावावर सह्या केल्या आहेत. आर. आर. पाटील (आबा) गटाकडे आता एकमेव नगरसेवक राहिला असून, राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे. तासगाव पालिकेत आबा गटाचे ११, तर दोन अपक्ष मिळून काका गटाचे ८ आणि एक काँग्रेसचा असे बलाबल होते. जयश्री धाबुगडे यांच्या काका गटातील प्रवेशाने त्यांचे ९ सदस्य झाले, तर आबा गटाकडे १० सदस्य राहिले होते. त्यातच आबा गटातील आयेशा नदाफ अपात्र ठरल्याने आबा गटाचे संख्याबळ ९ वर आले. त्यामुळे दिवंगत आबांनी काँग्रेसच्या संजय पवार यांना आपल्याकडे वळवून त्यांना नगराध्यक्षपद दिले होते. आबा गटाची सत्ता असली तरी काँग्रेसचा नगराध्यक्ष असे चित्र पालिकेत होते. आबांच्या पश्चात गेल्या दोन महिन्यांपासून नगराध्यक्षांच्या उचलबांगडीसाठी आबा आणि काका गटातून जोरदार हालचाली सुरू होत्या. तथापि अविश्वास ठरावासाठी आवश्यक संख्याबळ दोन्ही गटाकडे नव्हते. त्यातच दोन्ही गटांनी एकत्रित येण्याच्यादृष्टीनेही चाचपणी झाली होती. मात्र राष्ट्रवादीकडून विरोध झाल्यामुळे अविश्वास ठराव बारगळला. गेल्या चार दिवसांत भाजपने सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार हालचाली केल्या. खासदार संजय पाटील यांनी केलेले नियोजन, त्यांच्या शिलेदारांनी तंतोतंत अमलात आणले. पहिल्या टप्प्यात आबा गटाच्या तीन नाराज नगरसेवकांना रातोरात भाजपमध्ये प्रवेश दिला गेला. राष्ट्रवादी या धक्क्यातून सावरण्याआधीच दुसऱ्या दिवशी उपनगराध्यक्षांसह आणखी तीन नाराज नगरसेवकांना अविश्वास ठरावाच्या बाजूने काका गटात सामील केले गेले. सोमवारी अविश्वास ठराव दाखल करण्यापूर्वी आबा गटात राहिलेल्या दोन नगरसेवकांपैकी जाफर मुजावर हेही काका गटात सामील झाले आणि १८ नगरसेवकांपैकी १६ जणांनी अविश्वास ठराव दाखल केला. एकेकाळी आबा गटाचे पारडे जड असणाऱ्या नगरपालिकेतील सत्ता पूर्णत: काका गटाकडे आली आहे. खासदार संजयकाका पाटील यांनी राजकीय कसब वापरून पालिकेवर एकहाती सत्ता आणण्यात यश मिळविले आहे. नगराध्यक्ष पवार यांनी रविवारी स्पष्ट केल्याप्रमाणे, सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सादर केला. आबा गट काँग्रेसच्या पंगतीत अविश्वास ठरावानंतर नगरपालिकेत खासदार संजयकाका गटाचे संख्याबळ १६ झाले आहे, तर आबा गटाकडे एकमेव नगरसेवक अमोल शिंदे राहिले आहेत. आबा गटातील तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर चार नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नगरपालिकेत संख्याबळाच्यादृष्टीने आबा गट आता काँग्रेसच्या पंगतीत बसला असून, या गटाचे संख्याबळ काँग्रेसएवढेच राहिले आहे. यांनी दाखल केला अविश्वास... खासदार समर्थक : अनिल कुत्ते, राजेंद्र म्हेत्रे, बाबासाहेब पाटील, अविनाश पाटील, शिल्पा धोत्रे, शरद मानकर, सिंधू वैद्य, सारिका कांबळे, जयश्री धाबुगडे. ४खासदार गटात प्रवेश केलेले : रजनीगंधा लंगडे, सुशिला साळुंखे, विजया जामदार. खासदार गटाला पाठिंबा : सुरेश थोरात, अनुराधा पाटील, शुभांगी साळुंखे, जाफर मुजावर. नगराध्यक्षपदासाठी साळुंखेंचे नाव आघाडीवर पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे नवे नगराध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. काका गटात प्रवेश केलेल्या सुशिला साळुंखे, रजनीगंधा लंगडे यांच्यासह काका गटातील काही नावे चर्चेत आहेत. मात्र सुशिला साळुंखे यांचे नाव आघाडीवर आहे.