शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

सत्ता प्रकार ‘ब’ अन् प्रशासनाच्या वेळकाढूपणाचे भूत मानगुटीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:24 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यातील शहरांमध्ये मिळकतींवर असणारे ‘सत्ता ब प्रकाराचे भूत’ उतरत नसल्याने याला कोणता उतारा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा जिल्ह्यातील शहरांमध्ये मिळकतींवर असणारे ‘सत्ता ब प्रकाराचे भूत’ उतरत नसल्याने याला कोणता उतारा शोधावा, हा प्रश्न मिळकतदारांना सतावतो आहे. प्रशासकीय लकवा पध्दतीमुळे हे भूत मिळकतदारांची मानगूट सोडायला तयार नाही. प्रशासनाने वेगाने हालचाल केली नाही तर शासनाच्या तिजोरीलाच ६ ते ७ कोटी रुपयांचा फटका बसण्याची भीती आहे.

सातारा शहरातील विविध भागांमधील मिळकती या वर्ग १ मध्ये नोंदवल्या गेल्या आहेत. या मिळकती खासगी लोकांच्या ताब्यात आहेत तसेच अनेक पिढ्या या मिळकतीतच राहत आहेत. मात्र, या मिळकतींमध्ये नव्याने बांधकाम करणे, त्या विकणे यावर निर्बंध येतात. संबंधितांच्या नावे नाेंद असलेल्या या जमिनींवर सत्ता प्रकार ब (वर्ग १)चा शिक्का आहे.

साताराच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही समस्या आहे. पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये यासाठी स्वतंत्र एक खिडकी योजना राबविण्यात आलेली आहे. त्यामुळे कोरोना काळात लोकांना कार्यालयांत हेलपाटे मारावे लागत नाहीत. साताऱ्यात मात्र जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, नगरभूमापन कार्यालय येथे स्वतंत्र व्यवस्था नसल्याने नागरिकांची कोंडी होताना दिसते. जिल्हा प्रशासनाने याबाबत निर्णय घेणे अपेक्षित आहे; परंतु, कोरोनाचे कारण पुढे करणारे प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करते.

शासन निर्णयानुसार संबंधित मिळकतदारांनी प्रशासनाला १५ टक्के नजराणा भरुन प्रस्ताव द्यायचे असतात. हा नजराणा भरुन घेण्यातच टाळाटाळ केली जात आहे, तसेच ज्यांनी नजराणा भरला त्यांनाही प्रशासनाने अद्याप झुलवत ठेवलेले आहे. प्रशासनाने हे प्रस्ताव तत्काळ मार्गी लावले तर नागरिकांचे हेलपाटे थांबणार आहेत. मार्च २०२२पर्यंतच यासाठी मुदत आहे, ती जवळ येत असल्याने मिळकतदार तणावात जाऊ लागले आहेत.

साताऱ्यातील २०० मिळकतींचा समावेश

सातारा शहरातील सत्ता ब प्रकारातील मिळकती

गुरुवार पेठ ५९, बुधवार पेठ ८, प्रतापगंज पेठ ३२, सदाशिव पेठ ४७, रविवार पेठ १०९, पंताचा गोट १५, मल्हार पेठ ६३, माची ६, करंजे ३६, बसप्पा पेठ ३, कामाठीपुरा ५१, भवानी पेठ ८, गोडोली ३४, सोमवार पेठ १५, मंगळवार पेठ ८५, शुक्रवार पेठ ४, शनिवार पेठ ४०, सदर बझार ८३९, केसरकर पेठ ४३, यादोगोपाळ पेठ ११, व्यंकटपुरा पेठ ४३, रामाचा गोट २१, चिमणपुरा ३, दुर्गा पेठ ७, राजसपुरा ९

मिळकतदार का आहेत तणावात?

सत्ता प्रकार ब (वय १)च्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ८ मार्च २०१९ रोजी शासन निर्णय घेतला. नागरिकांनी या मिळकतींचा सत्ता प्रकार बदलण्यासाठी ३ वर्षांची मुदत दिली होती.

सध्याच्या सरकारने १० डिसेंबर २०२० रोजी या निर्णयाला स्थगिती दिली. अन् १५ मार्च २०२१ रोजी या निर्णयावरील स्थगिती उठवली. सत्ता प्रकार बदलण्याची ७ मार्च २०२२ ही अंतिम मुदत आहे.

कोरोना काळात प्रशासनाने ही प्रक्रिया राबविली नव्हती तसेच शासनाने अचानकपणे स्थगिती दिली, त्यामध्ये वेळ वाया गेला. त्यामुळे दिलेल्या मुदतीत वर्ग १च्या जमिनी वर्ग २ करण्यात अडचणी निर्माण होतील. तसेच शासनाने रेडिरेकनरचा दर वाढवला तर नजराणाच्या रकमेचा मोठा भुर्दंड मिळकतदारांना सोसावा लागेल.

जिल्हाधिकारी कार्यालयाचा फोटो वापरावा