सातारा : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरविले त्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये चक्क मराठी आणि इंग्रजी शिकविण्यासाठी तब्बल दोन महिने शिक्षक नाही. धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांना या दोन्ही भाषा शिकवण्यासाठी अन्य विषयाचे शिक्षक येत असल्याने विद्यार्थ्यांच्या आकलनावर त्याचा परिणाम झाला आहे. याविषयी पालकांनी शिक्षण विभागाकडे दाद मागितली, तर तिथेही शासकीय कारभाराचा नमुना अनुभवल्याने पालक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचे पातक कोणाच्या माथी मारायचे असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रतापसिंह हायस्कूलच्या शैक्षणिक दर्जा वाढीसाठी दोन वर्षांपूर्वीच रयत शिक्षण संस्थेबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार प्रतापसिंह हायस्कूल मध्ये आवश्यक शैक्षणिक बाबी पुरवण्याची जबाबदारी रयतकडे सोपविण्यात आली होती. त्यानुसार शाळेत आवश्यक असलेल्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी गरजेच्या बाबी रयत कडून पुरविल्या जात आहेत. शाळेतील एक शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने व दुसरे शाळेतच येत नसल्याने व्यवस्थापनाबरोबरच विद्यार्थ्यांपुढे पेच तयार झाला.
भाषेच्या विषयाला शिक्षकच नाही, विद्यार्थ्यांच्या नुकसानीचे पातक कोणाच्या माथी?; साताऱ्यातील प्रतापसिंह शाळेची व्यथा
By प्रगती पाटील | Published: September 20, 2023 5:42 PM