वाई : सुरूर येथील यशवंत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी प्रताप ज्ञानेश्वर यादव यांची निवड करण्यात आली. संस्थेतील माजी विद्यार्थी संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याने कौतुक होत आहे.
किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रताप यादव हे परिसरातील यशस्वी उद्योजक म्हणून परिचित आहेत. ते रविउदय पतसंस्था गुळुंबचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. ते यशवंत शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालकही होते. कार्यकाळात त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक व भौतिक प्रगतीसाठी भरीव कामगिरी केली. १९६० मध्ये स्थापन झालेल्या संस्थेच्या सहा माध्यमिक शाळा, एक इंग्रजी माध्यमाची शाळा, एक कला वाणिज्य महाविद्यालय आहे.
प्रताप यादव मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षीपासून त. ल. जोशी विद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षणाचे विज्ञान व वाणिज्य विषयाचे वर्ग सुरू केले. शैक्षणिक दूरदृष्टी असणारे नेतृत्व अध्यक्षपदी लाभल्याबद्दल संस्था सचिव ॲड. अरविंद चव्हाण, खासदार उदयनराजे भोसले, माजी आमदार मदन भोसले, संचालक माजी नगराध्यक्ष ॲड. श्रीकांत चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील, तुषार चव्हाण संचालिका, वृषाली चव्हाण यांनी कौतुक केले.
शिवाजी विद्यालय सुरुर, शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय सुरुर, श्री शिवाजी इंग्लिश मेडिअम स्कूल सुरुर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय वाई, गुळुंब हायस्कूल गुळुंब, कमलाबाई जोशी माध्यमिक विद्यालय केंजळ, बाळासाहेब पवार माध्यमिक विद्यालय उडतरे, किसनराव साबळे-पाटील, शिवथर हायस्कूल शिवथर, अरफळ यांच्या मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रताप यादव यांचा सत्कार करण्यात आला.
आयकार्ड फोटो
०४प्रताप यादव