दीपक शिंदेदे शाच्या स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या गणेश आळतेकर यांनी विजय मिळवला. त्यानंतर ही जागा कम्युनिस्ट पक्षाकडे गेली होती. सीपीआयकडून क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा लोकसभा मतदार संघाची जागा जिंकली. ही जागा सीपीआयकडून काढून घेणे सोपे नव्हते; पण काँग्रेसने किसन वीर यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी नाना पाटील यांचा पराभव करून ही जागा पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात घेतली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी सलग चार लोकसभा निवडणुकांमध्ये या मतदार संघातून विजय मिळविला.१९८४ ला यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाले होते. त्यामुळे साताऱ्याची जागा कोणी लढवायची? हा प्रश्नच होता. कºहाडमधून प्रेमलाताई चव्हाण या काँग्रेसची जागा राखून होत्या; पण साताºयात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर कोण? हा प्रश्न पडला होता. त्यातच शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदार संघावर बारीक नजर ठेवली होती. यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे साताºयाच्या जागेवर आपलाच हक्क समजून त्यांनी या ठिकाणाहून काँग्रेस अर्सच्या वतीने दादाराजे खर्डेकर यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसकडून प्रतापराव भोसले यांचे नाव समोर आले. या निवडणुकीत प्रतापराव भोसले यांनी दादाराजे खर्डेकर यांचा सुमारे ९५ हजार ५२० मतांनी पराभव केला. त्यानंतर १९८९ ला सुद्धा प्रतापराव भोसले हेच निवडून आले. त्यांना यावेळी जनता दलाचे डी. डी. रणदिवे यांचा विक्रमी सुमारे ३ लाख १६ हजार ९९१ मतांनी पराभव केला होता. तर १९९१ च्या निवडणुकीतही हॅटट्रीक साधत शिवसेनेच्या हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचा पराभव करत ते १ लाख ५९ हजार २१२ मतांनी निवडून आले होते. १९९६ च्या निवडणुकीत मात्र काँग्रेसविरोधी वारे फिरले आणि अटलबिहारी वाजपेयी तसेच भाजपचा करिश्मा पाहायला मिळाला. यावेळी प्रतापराव भोसले यांचा पराभव करून हिंदुराव नाईक-निंबाळकर निवडून आले. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली.
प्रतापराव भोसलेंनी सांभाळला साताऱ्याचा गड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 11:30 PM