शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

प्रीतिसंगमावर युवकांची हुल्लडबाजी नित्यनेमाचीच ! : युवती, महिलांसह पर्यटकांना होतोय नाहक त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:27 PM

कऱ्हाड येथील कृष्णा-कोयना नदीच्या प्रीतिसंगमावर महाविद्यालयीन युवकांकडून सध्या हुल्लडबाजी करण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. त्यांच्यामुळे येथे येणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देयातील काही युवक दुचाकीवरून जीवघेणी स्टंटबाजीही करतात. पोलीस प्रशासनाकडूनही या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात येईल, असे सांगण्यात आले होते

कºहाड : कऱ्हाड येथील कृष्णा-कोयना नदीच्या प्रीतिसंगमावर महाविद्यालयीन युवकांकडून सध्या हुल्लडबाजी करण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. त्यांच्यामुळे येथे येणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सात महिन्यांपूर्वी या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले होते. मात्र, त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याने येथे हुल्लडबाजी नित्यनेमाची बनली आहे.

कºहाडच्या प्रीतिसंगमावर दररोज दररोज सकाळी, दुपारी व सायंकाळच्यावेळी हजारो पर्यटक, प्रेमीयुगूल, नवविवाहित दाम्पत्य फिरण्यासाठी येतात. तर काही युवकांचे टोळकेही एकत्रितपणे दुचाकीवरून येते. यातील काही युवक दुचाकीवरून जीवघेणी स्टंटबाजीही करतात.

वाढदिवस साजरे करणे, फोटोसेशन करणे, मोठ-मोठ्याने आवाज करणे असे अनेक प्रकार त्यांच्याकडून केले जातात. त्यांचा या ठिकाणी येणाºया पर्यटकांना व महिलांनाही नाहक त्रास सहन करावा लागतोय.या ठिकाणी युवकांची हुल्लडबाजी रोखण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस चौकीची मागणी केली होती. या मागणीला सात महिने झाले तरी या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात आलेली नाही. तर नेत्यांचे दौरे, भेटी, एखादा मोर्चा, आंदोलनाव्यतिरिक्त पोलीस कर्मचारी या ठिकाणी फिरकतही नसल्याचे दिसते.

या ठिकाणी पहाटे फिरण्यासाठी येणाºया नागरिकांची संख्या खूप आहे. तसेच सायंकाळच्यावेळी क्षणभर विश्रांती घेण्यासाठीही शहरातील अनेक कुटुंबातील व्यक्ती येतात. येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळावरील स्वामी बाग ही पर्यटक व नागरिकांसाठी सदैव खुली असते.

या ठिकाणी पालिकेकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक तसेच सफाई कर्मचाºयांचीही नेमणूक करण्यात आलेली आहे. तरीही दुपारच्या वेळी युवकांकडून केल्या जाणाºया हुल्लडबाजीवेळी सुरक्षारक्षक असतात तरी कुठे? असा प्रश्न पडतो. एकंदरीत या ठिकाणी पालिकेने नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करणे गरजेची आहे.सात महिन्यांपूर्वीपासून चौकीची मागणीप्रीतिसंगमावर हुल्लबाज महाविद्यलायीन युवकांवर कारवाई व्हावी. युवती, महिलांना सुरक्षा मिळावी म्हणून या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात यावी, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विकास पवार, तालुकाध्यक्ष दादा शिंगण यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली होती. गत वर्षात एप्रिल महिन्यात मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना तसे निवेदनही दिले होते. त्यावेळी त्यांच्यासह पोलीस प्रशासनाकडूनही या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात आलेली नाही.पर्यटकांकडून पालन; स्थानिकांकडून उल्लंघनयशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळावरील स्वामी बागेत बाहेरून आणलेले खाद्यपदार्थ खाऊ नये, अथवा जेवण करून नये, अशा नियमांचे ठिकठिकाणी फलक लावलेले दिसतात. या नियमांचे राज्यभरातून येणाºया पर्यटकांकडून पालन केले जात असते. मात्र, स्थानिकांकडून उल्लंघन केले जाते.

प्रीतिसंगम बागेत पालिकेच्या सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली असतानाही या ठिकाणी सर्रासपणे प्रेमीयुगूल तसेच हुल्लडबाज तरुण यांच्याकडून आक्षेपार्ह कृत्ये केली जातात. त्यामुळे येथील पावित्र्य कमी होत आहे. याकडे पालिका व पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन तत्काळ पोलीस चौकी उभारावी, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.- सागर बर्गे, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कºहाड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर