कºहाड : बिबट्याची शिकार करून कातड्याची तस्करी करण्याचा प्रकार पाटण तालुक्यातील कळंबे गावात उघडकीस आला. या घटनेने वन्यप्राण्यांची असुरक्षितता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. मुळातच कºहाड, पाटण तालुक्यांत वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रकार यापूर्वीही उघडकीस आलेत. अंधश्रद्धा, भाकडकथा आणि हौसेखातर या प्राण्यांचा बळी घेतला जात असल्याचे त्या-त्यावेळी समोर आले आहे.जिभेचे चोचले पुरविण्यासाठी जेवढ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची हत्या होते, त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात वन्यप्राणी अंधश्रद्धा आणि भाकडकथांचे बळी ठरतात. अमुकतमुक आजारांवर एखाद्या प्राण्याचा अवयव गुणकारी असल्याचा समज पसरल्यानंतर अनेकजण अशा प्राण्यांचा शोध घेतात. त्यांची शिकार करून अवयवांचा वापर उपचारासाठी केला जातो. मात्र, हे करीत असताना आजारावरील हा ‘उतारा’ योग्य आहे की नाही, याची खातरजमाही केली जात नाही, हे दुर्दैव.साधारणपणे मानण्यात आलेल्या अन्नसाखळीत वाघ, सिंंह, जंगली कुत्री, बिबट्या हे प्राणी वरच्या स्थानावर आहेत. त्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर गिधाड, गरुड, अस्वल, जंगली मांजर, कोल्हा, तरस, हत्ती, हरीण, सांबर यांचा समावेश होतो. त्याखालील श्रेणीत माकड, लहान सांबर, भेकर, उंदीर, घूस या प्राणी व पक्षी तर त्या पाठोपाठच्या श्रेणीत कीटकांचा समावेश आहे. या सर्व प्राण्यांचे अस्तित्व निसर्ग नियमावर अवलंबून आहे. मात्र, यातील बहुतांश प्राणी सध्या मानवीवृत्तीचे बळी ठरतायत. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव या प्राण्यांची शिकार अथवा छळ केला जातोय. बहुतांशवेळा गैरसमजातून हे प्रकार जास्त प्रमाणात घडतात. असाध्य आजारांवर काही प्राण्यांच्या अवयवांचा उपचार सांगितला जातो. त्यातील तथ्य कोणालाही माहिती नसते.खवल्या मांजर : खवल्या मांजर दुर्मीळ आहे. मात्र, पौरुषत्व वाढते, या समजातून या मांजराची खवले काढून ती खाल्ली जातात.मोराचे पीस : शोभेसाठी बहुतांश ठिकाणी मोराची पिसे वापरली जातात. त्यामुळे शिकारी राजरोस मोरांची हत्या करून पिसे दारोदारी जाऊन विकतात.लाजवंती (लोरीस) : लाजवंतीचे डोळे काढून त्यापासून बनविलेले औषध वापरले तर रात्री दिसण्यात फरक पडतो, असे समज आहे.पाकोळ्या : घरटी सूप तयार करण्यासाठी पाकोळ्यांचा वापर केला जातो. हे सूप आरोग्यासाठी चांगले असल्याचा गैरसमज पसरला आहे.उदमांजर : मांजराच्या उग्र ग्रंथीतील द्रव्य काढून ते सुगंधित करून विकले जाते. त्यातूनमोठ्या प्रमाणात कमाई केली जाते.
भाकडकथा, हौसेखातर वन्यप्राण्यांचा बळी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 10:44 PM