शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

बिले वसूल करण्यापेक्षा कामांना प्राधान्य द्या!

By admin | Published: November 11, 2016 10:37 PM

कऱ्हाडात सभा : सभापतींचे ‘वीजवितरण’च्या अधिकाऱ्यांवर ताशेरे

कऱ्हाड : ‘वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रश्नाचे गांभीर्य नसते. पंचायत समिती सदस्य हा त्यांच्या विभागातील बारा-पंधरा हजार मतदारांचे प्रतिनिधीत्व करीत असतो. त्यामुळे सदस्यांना लोकांच्या प्रश्नांना उत्तरेही द्यावीच लागतात. अधिकाऱ्यांनी केवळ बिल वसुलीच्या कामास प्राधान्य देण्यासोबत जनतेच्या निगडीत प्रलंबित कामांनाही प्राधान्य द्या,’ अशा शब्दात सभापती देवराज पाटील यांनी वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना खडसावले. कऱ्हाड पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी सभेस गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, सहायक गटविकास अधिकारी मधुकर देशमुख उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला सदस्या अश्विनी लवटे यांनी मुंढे येथील डीपी बदलण्याचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याबद्दल वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. अधिकाऱ्यांकडून महिला सदस्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोपही यावेळी लवटे यांनी केला. वीज कंपनीकडून मुंढे गावातच बेकायदेशीरपणे बांधकामास कनेक्शन देण्यात आले आहे, अशी माहिती सदस्या लवटे यांनी सभागृहास दिली. याबाबत जर ग्रामपंचायतीची हरकत नसेल तर कनेक्शन कसे देण्यात आले, याबाबत खुलासा करण्याची सूचना सभापतींनी केली. वीजमीटरचे रिडींग योग्य प्रकारे घेतले जात नसल्यामुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले येत असल्याचा आरोप अनिता निकम यांनी यावेळी केला. यावर लवकरच मीटरचे रिडींग मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. कृषी विभागाकडे विविध औजारांसाठी अनुदान उपलब्ध आहे.परंतु त्यासाठी विहित मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अनिता निकम यांनी एसटी महामंडळाच्या कारभारावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. कऱ्हाड आगाराच्या बसेस सेवारस्त्यांवरून न नेता महामार्गांवरूनच नेण्यात येत असल्यामुळे प्रवासी, नोकरदार तसेच विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याचे निकम यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणारी कऱ्हाड-म्होप्रे बस बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. ही बस बंद करून फक्त भोळेवाडीसाठी बससेवा सुरू करण्याचे कारण काय, असा प्रश्न सदस्य लक्ष्मण जाधव यांनी उपस्थित केला. म्होप्रेसाठी पुन्हा बससेवा सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. तलाठी-ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे जनतेचे हाल होत असल्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी रुपाली यादव यांनी केली. (प्रतिनिधी) तालुक्यात २२६ गावांत ‘मागेल त्याला शेततळे’ मागेल त्याला शेततळे’ ही योजना कऱ्हाड तालुक्यातील २२६ गावांमध्ये राबवली जाणार आहे. यासाठी आॅनलाईन पद्धतीने प्रस्ताव मागवण्यात येणार आहेत. तालुका कृषी अधिकारी खरात यांनी कृषी विभागाचा आढावा सादर करताना माहिती दिली.