सातारा : खंबाटकी बोगद्याजवळील ‘एस’ वळणावर कर्नाटकातील १८ मजुरांचा बळी गेल्याने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. हे वळणच चुकीचे तयार करण्यात आले असून, आतापर्यंत पन्नासहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा प्रकारच्या या वळणावर वारंवार अपघात होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर आता सदोष मनुष्यवधाचा तिसऱ्यांदा गुन्हा दाखल करण्याची हालचाल सुरू केली आहे.खंबाटकी बोगदा वाहतुकीस खुला करण्यात आल्यानंतर तिसºया महिन्यांतच या ठिकाणी कंटेनर उलटला होता. यामध्ये पाचजणांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर या वळणावर अपघाताची मालिका सुरू झाली; ती अखंडितपणे सुरूच राहिली आहे. ‘एस’ वळण धोकादायक असल्याचे सांगत अनेकांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. मात्र, या वळणावर तकलादू उपाययोजना करण्यापलीकडे प्रशासनाने काहीच केले नाही. आता या वळणावर १८ जणांचा जीव गेल्यानंतर प्रशासन पुन्हा खडबडून जागे झाले आहे. २०१४ ला संबंधित ठेकेदारावर खंडाळा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने जामीन घेतला. त्यानंतर हा खटला आता न्यायालयात सुरू आहे. आता तिसºयांदा त्याच ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत.अपघातप्रश्नी यांच्यावर गुन्हा दाखल होणारभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांचे उपठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.बेकायदा प्रवासी वाहतूक अडचणीचीटेम्पोमध्ये अगोदरच मोठ्या प्रमाणात साहित्य भरले होते. त्याच साहित्यावर ३७ मजूर बसले होते. मालवाहतूक करणाºया टेम्पोला प्रवासी वाहतूक करता येत नाही, असे असताना संबंधित टेम्पो चालकाने बेकायदा प्रवासी वाहतूक केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘एस’ वळण तयार करणाºया संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करताना जिल्हा प्रशासनासमोर अडचणी असून, नेमका गुन्हा दाखल कसा करायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर ‘आ’ वासून उभा आहे.जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी गुरुवारी बैठक बोलविली असून, सर्व विभागातील अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये यावर उपाययोजना आणि घडलेल्या घटनेचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतरच संंबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा की नाही, यासंदर्भात निर्णय होणार आहे.
‘त्या’ ठेकेदाराला सरळ करण्याची तयारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:12 PM