कुडाळ : कुडाळ परिसरात गुरुवारी सकाळपासूनच बदललेल्या वातावरणामुळे अधिक उष्मा जाणवत होता. दुपारी चारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. परिसरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून दुपारनंतर दररोज अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून कुडाळ आणि परिसरात दुपारपर्यंत उन्हाची तीव्रता अधिक होती. यामुळे दुपारनंतर दररोजच कमीअधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे वाढत्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिसला मिळाला आहे. गुरुवारी दुपारी चारनंतर सुरू झालेला पावसाने सुमारे दीड तास हजेरी लावली. मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने मात्र वाढत्या उष्म्याची दाहकता काहीशी कमी होऊन वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे.
परिसरात गेल्या काही दिवसांपासून सरासरी तापमानातही वाढ झाली आहे. अशातच सकाळपासून वातावरण बदललेले होते. उन्हाची तीव्रताही खूप होती. यामुळे दुपारी चारच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली.