महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये मंगळवारी
सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी तीनच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे दोन तास हा पाऊस पडल्याने हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला. मेघगर्जनेसह महाबळेश्वर शहर परिसरात मुसळधार पावसाने गारांसह धुवांधार दोन तास पावसाची बॅटिंग सुरू होती.
महाबळेश्वर तालुक्यात गेले तीन ते चार दिवस दुपारनंतर विविध ठिकाणी पाऊस पडल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सकाळपासून शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण होत असल्यामुळे हाता-तोंडाशी आलेली पिके अवकाळी पावसामुळे वाया जातील, या भीतीमुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे महाबळेश्वरची मुख्य बाजारपेठ बंद असल्यामुळे बाजारपेठ परिसरात शुकशुकाट पसरला होता.