शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

राष्ट्रपती विजेता डीवायएसपी लाच घेताना सापडला

By admin | Published: May 08, 2016 12:24 AM

बेबी पाटणकरकडून पाच लाख : ड्रग्ज प्रकरणात ‘मनसे’चा जिल्हा सरचिटणीस युवराज ढमाळ मध्यस्थी

खंडाळा : मॅफेड्रॉन ड्रग्ज तस्करी प्रकरणातील संशयित आरोपी बेबी पाटणकर हिच्याकडून वाईचे पोलिस उपअधीक्षक दीपक हुंबरे याच्यासाठी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हा सरचिटणीस युवराज ढमाळ याला मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खंडाळा येथे रंगेहाथ पकडले. तर दीपक हुंबरे यांना सातारा न्यायालयातून पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, या अधिकाऱ्याला २५ जानेवारी २०१२ रोजी राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले होते. संबंधित प्रकरणाने खंडाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, यामध्ये आणखी काही पोलिस अधिकारी यांचा समावेश असल्याची चर्चा पोलिस ठाण्याच्या आवारात चालू होती. मॅफेड्रॉन ड्रग्ज तस्करी प्रकरणी खंडाळा तालुक्यातील कण्हेरी या गावी मार्च २०१५ रोजी मुंबई येथील हवालदार धर्मराज काळोखे याच्याकडून अमली पदार्थांचा मोठा साठा केल्याचे उघड झाल्यानंतर महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून याचे पाळेमुळे खणण्यात पोलिसांना यश आले होते. यामध्ये बेबी पाटणकर यांच्या नातेवाइकांसह अनेक पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यामुळे या प्रकरणाची महाराष्ट्रभर मोठी चर्चा झाली होती. यातच प्रयोगशाळेतून हा अमली पदार्थ नसल्याचा दाखला बेबी पाटणकर व धर्मराज काळोखे यांना मिळाल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते. यामध्ये खंडाळा पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या संशयित आरोपींच्या गाड्याही त्यांनी सोडवल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाचे गौडबंगाल काय? असा प्रश्न तालुकावासीयांना पडला होता. तर या प्रकरणातील बेबी पाटणकर व धर्मराज काळोखे यांचा खंडाळा तालुक्यात वावर वाढला होता. त्यामुळे या घटनेला वेगळे वळण लागणार याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत होती. अखेर तसेच घडले. एक अधिकारी व एक सामाजिक कार्यकर्ता बेबी पाटणकर व धर्मराज काळोखे यांच्या जाळ्यात सापडले. खंडाळा तालुक्यातील कण्हेरी येथून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थ (मॅफेड्रॉन) प्रकरणी मुख्य सूत्रधार बेबी पाटणकर व तत्कालीन मुंबई पोलिस हवालदार धर्मराज काळोखे यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी तब्बल २२ कोटी रुपयांचा ११२ किलो ड्रग्जचा साठा कण्हेरी येथील राहत्या घरातून ९ मार्च २०१५ रोजी जप्त करण्यात आला होता. खंडाळा आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले होते. सूत्रधार बेबी पाटणकर व धर्मराज काळोखे यांना पोलिस कोठडीही देण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय पोलिस अधिकारी दीपक हुंबरे करीत होते. या प्रकरणाचा न्यायालयात केस डिस्चार्ज करण्यासाठी अहवाल सादर करण्यासाठी दीपक हुंबरे याने बेबी पाटणकरकडे मुंबई येथे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर बेबी पाटणकरने मुंबई लाचलूचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी ट्रॅप लावला. शनिवारी सकाळी मुंबई येथून निघताना संबंधितांचे बोलणे फोनवरून झाले होते. शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास खंडाळा येथील महामार्गालगत असणाऱ्या हॉटेल आमराई येथे पोलिसांचे हस्तक व मनसेचे माजी सरचिटणीस युवराज ढमाळ याच्याकडे बेबी पाटणकरने पैशाची बॅग सुपूर्द केली. त्यांच्यासोबत आलेल्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने रकमेसह युवराज ढमाळ याला ताब्यात घेतले. त्यानंतर दीपक हुंबरे हे सातारा येथे न्यायालयात कामकाजासाठी गेल्याचे समजताच पोलिसांनी सातारा येथे दोन पथके रवाना करून दीपक हुंबरे यांना ताब्यात घेऊन खंडाळा येथे चौकशीसाठी आणले. दुपारपासून युवराज ढमाळ व त्यानंतर दीपक हुंबरे यांची चौकशी उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, या प्रकरणात यापूर्वीही रक्कम अधिकाऱ्यांनी घेतली असल्याचे समोर आल्यामुळे दीपक हुंबरे यांच्या पुण्यातील घरावर तर युवराज ढमाळ यांच्या पारगाव-खंडाळा येथील घराचीही झडती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी) फुकटच्या ‘डब्यांची’ चटक.. संबंधित पोलिस अधिकाऱ्याला चटकदार जेवण खायची सवय होती. कुटुंबीय परगावी असल्यामुळे त्याचा विशेष भर घरगुती जेवणावर असायचा. म्हणूनच त्याच्या कार्यक्षेत्रातील अवैध व्यवसाय करणाऱ्या अनेकांकडे त्याने जणू खाणावळच लावली होती. दुपारी चारनंतर साहेबाचा फोन आला की हे व्यावसायिक घरी दोन-तीन किलो मटण घेऊन जाणार. त्यानंतर साहेबाच्या जेवणाचा झक्कास बेत रंगायचा. सुके-पातळ मटण, चपाती किंवा भाकरी, जिरा राईस आणि कांदा लिंबू ही त्यांची फरमाईश असायची. एकदा असेच एक जणाने पाच माणसांचे जेवण तयार करून ते वाईला पाठवले. जेवणाचे डबे उघडल्यावर त्यात कांदा आणि लिंबू नसल्याचे या अधिकाऱ्याच्या निदर्शनास आले. त्याने रात्री फोन करून त्याला कांदा लिंबू आणण्यास सांगितले. तो बिचाराही सुमारे तेरा किलोमीटर फक्त साहेबासाठी कांदा लिंबू घेऊन गेला. चॉकलेटचा पाहुणचार.. पण कुणाच्या जीवावर ? वाई पोलिस ठाण्यात आपल्या कार्यालयात येणाऱ्यांना वाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी हुंबरे चॉकलेट देऊन पाहुणचार करायचा. ‘आमच्या पोलिस ठाण्यात चहा येत नाही’, असे सांगून ठाण्यात येणाऱ्याला तो एक रुपयाचे एक चॉकलेट द्यायचा. येणाऱ्यांना याचे नवल वाटायचे. चहासाठी स्वत:च्या खिशातून पैसे काढण्यापेक्षा खास पाचगणीतून मागविलेल्या चॉकलेटवर त्याचा रूबाब चालायचा; मात्र याचा खर्च कोण करायचा, हे मात्र गुलदस्त्यातच बरं का ! कोट्यवधींची लाच स्वीकारली.. या प्रकरणातील फिर्यादी बेबी पाटणकर यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणात दीपक हुंबरे यांनी वेळोवेळी दमबाजी करीत कोट्यांवधी रुपयांची मागणी केली. आजपर्यंत जामीन मिळावा, गुन्ह्यातील वाहने सोडवणे यासह अन्य प्रकारात वेळोवेळी कोट्यावधी रुपये स्वीकारले आहेत.