शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
2
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
3
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
4
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
6
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
7
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
8
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
9
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
10
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
11
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
12
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
14
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
15
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
16
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
17
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
18
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
19
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

जिल्ह्याच्या शौर्याचा सार्थ अभिमान

By admin | Published: September 23, 2016 11:29 PM

संभाजी पाटील-निलंगेकर : विक्रम पावसकर यांचा वाढदिवस उत्साहात

कऱ्हाड : ‘सातारा जिल्हा शूरांची आणि वीरांची भूमी आहे. मातीसाठी लढणाऱ्या अनेक जवानांनी वीरमरण पत्करले आहे. याचा सातारा जिल्ह्यासह आम्हाला सार्थ अभिमान आहे. या वीरमरण पत्करलेल्या जवानांच्या घरची आणि गावाची माती मुंबईत अरबी समुद्रामध्ये बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकापर्यंत पोहोचवा. या मातीचे कलश स्मारकापर्यंत पोहोचविण्याची सुरुवात विक्रम पावसकरांच्या पुढाकारातून येथील मावळे करतील,’ असा विश्वास कामगार व भूकंप पुनर्वसन विभागाचे मंत्री संभाजीे पाटील-निलंगेकर यांनी व्यक्त केला. तसेच विक्रम पावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले. कऱ्हाड येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जाहीर सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी विक्रम पावसकर व रिओ आॅलिम्पिक पटू ललिता बाबर यांचा सत्कार मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे, भरत पाटील, मनोज घोरपडे, नीता केळकर, विनायक पावसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. शेखर चरेगावकर म्हणाले, ‘आजचा विक्रम पावसकर यांचा वाढदिवस प्रथमच मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. काहींना प्रश्न पडला असेल की, यंदाचा वाढदिवस मोठा का? उगाच ताकाला जाऊन भांडं लपविण्यात अर्थ नाही. आज जे भगवं वादळ मोठ्या प्रमाणात दिसतंय ना ते पालिका निवडणुकीत आपणाला कायम ठेवायचं आहे. आम्ही तयारीला लागलोच आहे. तुम्हीही नगरपालिकेत कमळ फुलविण्यासाठी कामाला लागा.’ विक्रम पावसकर म्हणाले, ‘मंत्री पाटील यांनी आज कऱ्हाड शहरातील रस्त्यांची दुरवस्था पाहिली आहे. तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतेच आठ कोटी रुपये निधी कऱ्हाडसाठी दिल्याचे त्यांनी सांगितले. कऱ्हाडकरांनी जर भाजपवरील विश्वास वाढविला तर या आठच्या पुढे आणखी एक शून्य वाढू शकतो.’ (वा.प्र) भूकंप आणि पुनर्वसन... ‘आजच्या या कार्यक्रमाला राज्याचे भूकंप व पुनर्वसन मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर आवर्जून उपस्थित आहेत. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत विक्रम पावसकरांच्या नेतृत्वाखाली राजकीय भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही,’ असे सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी सांगताच टाळ्या आणि शिट्ट्यांचा प्रतिसाद मिळाला. त्यावर चरेगावकर यांनी मंत्री पाटील यांच्याकडे बघत पराभूत विरोधकांचे पुनर्वसन करायला तुम्हालाच बोलवू, असे वक्तव्य करताच हशा पिकला. तुम्ही मेहरबान, आम्ही नगरसेवक! हिंदू एकता आंदोलनाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विनायक पावसकर यांनी आपल्या भाषणात आम्हाला मेहरबान म्हणून मिरवायला आवडत नाही. उलट सुज्ञ मतदार आमच्यावर मेहरबान झाले म्हणून मला आणि विक्रमला तुमचे नगरसेवक म्हणून काम करायला संधी मिळाली. भविष्यात राजकारणामध्ये मोठी संधी मिळाली तरी आपला सेवक भाव कमी होणार नाही, असे सांगताच अवघा परिसर ‘जय शिवाजी, जय भवानी’च्या घोषणांनी दुमदुमून गेला. ललिता बाबरला लाखाचा धनादेश रिओ आॅलिम्पिकमधील खेळाडू ललिता बाबरला यावेळी १ लाख १ हजाराचा धनादेश प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ललिता बाबर म्हणाली, ‘खेळाडूंना असा पाठिंबा मिळत गेला तर अनेक ललिता तयार होतील. मात्र, मुलींना चूल आणि मूल यापुरते मर्यादित ठेवू नका.’