सातारा : केंद्र शासनाने अर्थसंकल्पात आरोग्यावर मोठा भर दिला असला तरी आरोग्य विभागात आजही अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांना सेवा देताना अडचणी येतात. सातारा जिल्ह्यात तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वर्ग ३ व ४ ची ७०० हून अधिक पदे रिक्त आहेत.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे चालविण्यात येतात. या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा दिली जाते. पण, वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांची पदे सतत रिक्त असतात. सध्यस्थितीत आरोग्य अधिकाऱ्यांची पदे भरली असली तरी इतर काही पदे रिक्त आहेत. वर्ग ३ आणि ४ ची अनेक पदे मंजूर असूनही रिक्त आहेत. यामध्ये औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, सेविका, पर्यवेक्षक यांची १ हजार ५७१ पदे मंजूर आहेत. पण, यामधील सध्या ८१३ कार्यरत असून, ७५८ रिक्त आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून, यावरच प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्राचा डोलारा उभा आहे.
कोरोनासारखी संकटे लक्षात घेऊन आरोग्य विभाग सज्ज असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी शासनस्तरावरुनच हालचाली होण्याची खरी गरज आहे.
आरोग्य केंद्राची संख्या
आकडेवारी अशी
आरोग्य केंद्रे ७२, उपकेंद्रे ४००
ऐकूण कर्मचारी संख्या
गट अ पदे १६७
वर्ग ३ व ४ पदे १५७१
एकूण रिक्त कर्मचाऱ्यांची संख्या
गट अ रिक्त पदे ५
वर्ग ३ व ४ रिक्त पदे ७५८
कोट .
राज्य शासनाने परवानगी दिल्याने आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली आहेत. त्यामुळे फारशी अडचण येत नाही. मात्र, वर्ग तीन आणि चारची अनेक पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठी परवानगी मिळाली इतर कर्मचाऱ्यांवर ताण येणार नाही.
- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी
चौकट :
डॉक्टर आहेत, कर्मचारी नाहीत...
सातारा जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांची तपासणी होत आहे. पण, इतर कर्मचारी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण वाढतोय. त्यासाठी काही कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात दुसरीकडे जावे लागते. त्यामुळे तारेवरची कसरत सुरू असते.
............................................................................
...............................................................