शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

प्राथमिक शिक्षक बँक निवडणूक होणार रंगतदार...

By admin | Published: May 25, 2015 10:57 PM

गटरचना महत्त्वाची : शिवाजीराव पाटील गटाची भूमिका निर्णायक

कुडाळ : गतपंचवार्षिक निवडणुकीत संघात दोन गट पडल्याने शिक्षक बँकेत शिक्षक समितीची सत्ता आली होती. याचाच फायदा घेऊन समितीने स्वत:ला सुरक्षित करण्याच्या उद्देशाने मतदारसंघांची नव्याने गटरचना केली आहे. कराड-पाटण सोसायटीत सत्तेवर आलेल्या शिवाजीराव पाटील प्रणित संघाची भूमिकाच बँक निवडणुकीत निर्णायक ठरणार, हे निश्चित आहे. विजयासाठी पाटील गट आपल्याबरोबरच राहावा, यासाठी थोरात गट, शिक्षक समिती प्रयत्नशील आहे. त्यामुळे पाटील गट कोणाबरोबर जाणार? यावरच समीकरण ठरली जाणार आहेत. कराड-पाटण सोसायटीत सत्ता मिळवल्यामुळे माजी आमदार शिवाजीराव पाटील प्रणित संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये बँक निवडणुकीचा भलताच उत्साह दिसतो आहे. त्यादृष्टीने त्यांनी बांधणी सुरू केली आहे. तर संभाजीराव थोरात प्रणित शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मुळीक यांनीदेखील जिल्हाभर संघटना बांधून सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी केली आहे. मात्र ९७ व्या घटना दुरुस्तीमुळे संचालकांनी संख्या २८ वरून २१ वर आल्यामुळे मतदारसंघ गटरचना बदलली आहे. गटरचना करताना सत्ताधारी शिक्षक समितीने आपल्याला सोयीस्कर अशीच गटरचना केल्यामुळे पाटील-थोरात गटाला एकत्र येऊनच ही निवडणूक लढवावी लागेल. स्वतंत्र लढल्यास मत विभाजनाचा फायदा हा समितीलाच होणार व संघाला सत्तेपासून बाजूला राहावे लागेल अशीच राजकीय परिस्थिती आहे.पाटील गटाच्या संपर्कात थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मुळीक आहेत. त्यांच्याकडून पाटील गटाला बरोबर आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर कराड-पाटण सोसायटीप्रमाणे समितीदेखील पाटील गटाबरोबरच निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे. तसे प्रयत्नदेखील त्यांच्याकडून सुरू आहेत. त्यामुळे पाटील गटाला कोणताही पर्याय खुला असल्यामुळे पाटील गट ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. (प्रतिनिधी)संघाच्या फुटीचा समितीला फायदा...शिक्षकांची भूमिका संघाने लढा देऊन आपली ताकद वाढवली आहे. संघातील फुटीचा फायदा समितीला होऊ नये, कराड-पाटण सोसायटीत पाटील गटाने समितीला बरोबर घेतले. मात्र, शिक्षक बँकेत समितीला बाजूला ठेवून पाटील-थोरात गटाने एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी दोन्ही संघांतील शिक्षकांची भूमिका आहे.माजी आमदार शिवाजीराव पाटील यांचे नेतृत्व मान्य करून जो कोणी आमच्याबरोबर येईल त्यांना बरोबर घेऊन आम्ही बँक निवडणूक लढवणार.- तुकाराम कदम,कोषाध्यक्ष, पाटील प्रणित शिक्षक संघ राज्य