शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

साताऱ्याच्या पत्रप्रपंचाची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल

By admin | Published: March 16, 2017 11:30 PM

पाच लाख पत्र : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी ‘मसाप’चे विनोद कुलकर्णी यांच्या प्रयत्नांना यश

सातारा : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या वतीने महाराष्ट्रातून ५ लाख पत्रे पाठविण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यातून एक लाख पत्रे पाठविली होती. ‘मसाप’च्या पुणेचे कार्यवाह विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात राबविलेल्या या उपक्रमाची दखल दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने घेतली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, याबाबतचा अहवाल साहित्य अकादमीने पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवून दोन वर्षे झाली. फक्त पंतप्रधान मोदी यांच्या सहीसाठी हा निर्णय राहिला आहे. तो त्यांनी त्वरित घ्यावा, यासाठी मसाप, पुणेच्या वतीने महाराष्ट्रातून ५ लाख विनंती पत्रे पंतप्रधान मोदी यांना पाठविण्याचा संकल्प केला होता. सातारा जिल्ह्यातून १ लाख पत्रे पाठवून खारीचा वाटा उचलला होता. मसाप शाहूपुरी शाखेच्या वतीने पाठवण्यात येणाऱ्या पत्र उपक्रमाचा प्रारंभ सातारा शहर पोस्ट कार्यालयात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पत्रपेटीत पत्र टाकून झाला. यावेळी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, किशोर बेडकिहाळ, मसाप, पुणेचे कार्यवाह विनोद कुलकर्णी, डॉ. उमेश करंबळेकर, शाहूपुरी शाखेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. मराठी भाषा १० कोटी लोकांची भाषा असून, या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. पत्र पाठवण्याच्या उपक्रमात अनेकांनी सहभाग घेतला होता. यासाठी ठोस कृती कार्यक्रम ठरविला. एका दिवशी २५ हजार पत्रे पाठविली. त्यानंतर १५ दिवसांत उर्वरित ७५ हजार पत्रे पाठविली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून ५ लाख पत्रे पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविली. या पत्रांची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे. पंतप्रधान कार्यालयातील विभागप्रमुख अलोक सुमन यांनी विनोद कुलकर्णी यांना पत्र पाठविले आहे. विनोद कुलकर्णी यांनी पाठविलेली पत्रे मिळाली असून, ती पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविली असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या विषयात लक्ष घातले असून यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. साताऱ्यातील उपक्रमाचे प्रमुख नेत्यांनी दखल घेतल्याने यश मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)शरद पवारांचाही मोदींशी संवाद माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनीही या उपक्रमाची दखल घेतली असून, त्यांच्या स्वीय सहायकांनी विनोद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. त्यानंतर १४ मार्च रोजी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना एक पत्र दिले. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रासह राज्याबाहेर सुमारे नऊ कोटी लोक मराठी भाषिक आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. यासंदर्भात पाच लाख लोकांनी आपल्या कार्यालयास पत्रे पाठविली आहेत. याबाबतची संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाली असून, केवळ आपली सही राहिली आहे. मराठी भाषकांच्या भावनांचा आदर करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा.’